आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थव्यवस्थेची सुरुवात झाल्यामुळे डाळी महाग होऊ लागल्या आहेत. गेल्या महिनाभरात डाळी आणि कडधान्यांच्या किमती १६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, शाळा-महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू झाल्यामुळे, तसेच पर्यटन वाढल्याने हॉटेल-रेस्टॉरंटची संस्थात्मक मागणी वाढली आहे. दरम्यान, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या मोठ्या उत्पादक राज्यांमध्ये या वर्षी तूर पीक ३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
गेल्या एका महिन्यात काबुली चण्याच्या भावात सर्वाधिक १६% वाढ झाली आहे. सध्या त्याची ११० रुपये किलो दराने विक्री हाेत आहे. मागच्या महिन्यात हा भाव ९५ रुपये किलाे हाेता. देशी चणाही ५,००० रुपयांवरून ५,१०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.
कमोडिटी विश्लेषक हरीश सेठ यांच्या मते, अलीकडच्या वर्षांत डाळींच्या किमती जवळपास स्थिर आहेत. उलट कापसाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड वाढवली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये तूर आणि उडीद पिकाच्या लागवडीत २५-३०% घट झाली आहे. त्यामुळे कडधान्याच्या भावाला बळ मिळाले.
मार्च ते मे हा असताे साठवणीचा हंगाम
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील डाळ व्यापाऱ्यांच्य म्हणण्यानुसार , तूर ही एकमेव डाळ आहे, जिचा ग्राहकही साठा करतात. हा ग्राहक साठा मार्च ते मेपर्यंत चालतो. यामुळे या काळात बाजारातील सेंटिमेंट सामान्यतः मजबूत राहते.
माेठ्या उत्पादक राज्यांत तूर एमएसपीच्या वर
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सारख्या प्रमुख तूर उत्पादन करणाऱ्या राज्येमध्ये सरासरी बाजारभाव ६,४०० ते ६,५०० प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. तर तुरीचा किमान आधारभूत दर हा ६,३०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.
सरकारचाही कमी उत्पादनाचा अंदाज
२०२१-२२ च्या हंगामातील दुसऱ्या अंदाजानुसार सरकारने ४० लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या तुलनेत गेल्या हंगामात तुरीचे देशांतर्गत उत्पादन ४.३२ लाख टन होते. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी सुमारे २०% कमी उत्पादन होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.