आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bloomberg:इंडिया सिमेंट्समध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करू शकतात डीमार्टचे मालक दमाणी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि डीमार्ट स्टोअर्सचे मालक राधाकिशन दमाणी आता इंडिया सिमेंट्समध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या विचारात आहेत. ६६ वर्षीय दमानी अॅव्हेन्यू सुपरमार्केट्सचे मालक असून त्यांनी यासाठी इंडिया सिमेंट्समध्ये कंट्रोलिंग स्टेक असणारे एन.श्रीनिवास यांच्याशी टेकओव्हरबाबत औपचारिक चर्चा केली. या वृत्तानंतर बुधवारी बीएसईमध्ये इंडिया सिमेंट्सच्या शेअर्सनी ११% उसळून १३९.३० च्या उंचीला स्पर्श केला. ही गेल्या एका महिन्यादरम्यान एका दिवसाची सर्वात उच्च वाढही राहिली. सायंकाळी व्यवसाय समाप्तीवर कंपनीचे समभाग ४.८४% वाढीसह १३२.१० रुपयांवर बंद झाले.

दुसरीकडे, अॅव्हेन्यू सुपरमार्केट्सचे समभाग दिवसभराच्या व्यवसायात ३.१६% पर्यंत कोसळल्यानंतर सायंकाळी २.५३% नुकसानीसह २,३४०.२५ रुपयांवर बंद झाले. रिटेल सम्राट राधाकिशन दमाणी आणि त्यांचे कुटुंब गेल्या अनेक महिन्यांत इंडिया सिमेंट्सचे समभाग खरेदी करत आहेत. ३१ मार्चपर्यंत कंपनीत दमाणी आणि त्यांच्या कुटुंबाची हिस्सेदारी चौपट वाढून २०% झाली आहे. बीएसईमध्ये बुधवारी बंद भावानुसार इंडिया सिमेंट्सचे एकूण बाजार भांडवल ४,०९३.७४ कोटी रुपये आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आता इंडिया सिमेंट्सच्या शेअरची किंमत ८५% म्हणजे दुप्पट वाढली आहे. ७४ वर्षे जुनी कंपनी इंडिया सिमेंट्सची तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह देशात १० प्लँट आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस भारतीय डिटर्जंट कंपनी निरमा लिमिटेड इमामी ग्रुपचा सिमेंट व्यवसाय खरेदी करण्यासाठी ५,५०० कोटी रु. देण्यास तयार झाली होती. चेन्नईतील कंपनी इंडिया सिमेंट्समध्ये एन. श्रीनिवास यांची सध्या २९% भागीदारी अाहे.

बातम्या आणखी आहेत...