आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Demat Accounts Cross 10 Crore For The First Time, I Accounts Doubled After Corona I More Than 22 Lakh Opened In August

शेअर बाजारावर वाढतोय विश्वास:पहिल्यांदाच डिमॅट खाती 10 कोटींच्या पुढे, कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये गगनभेदी झेप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये पहिल्यांदाच डिमॅट खात्यांची संख्या 10 कोटींच्या वर गेली आहे. गेल्या महिन्यात देशात 22 लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली, जी चार महिन्यांतील सर्वाधिक वाढ ठरली.

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिडेट (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल)च्या मते, गेल्या महिन्यात डिमॅट खात्यांची एकूण संख्या १० कोटी ५ लाखांहून अधिक झाली आहेत. कोरोना महामारी सुरू होण्याआधी मार्च २०२० पर्यंत देशात सुमारे ४ कोटी डिमॅट अकाउंट होते. म्हणजे फक्त दोन वर्षांदरम्यान डिमॅट खात्यांत १००%पेक्षा जास्त वाढ झाली. मोतीलाल ओसवाल आर्थिक सेवेचे मुख्य कार्यक्रारी अधिकारी (ब्रोकिंग अँड डिस्ट्रिब्युशन) अजय मेनन यांच्या मते, किरकोळ गुंतवणूकदार इक्विटी बाजारांकडे आकर्षित होत आहेत. ३१ मार्च २०२२ पर्यंत भारतात सक्रिय डिमॅट खात्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत ६३% वाढुन ८.९७ कोटी झाली होती. म्हणजेच इतके लोक शेअर बाजाआत ट्रेडिंग करत आहेत. डिमॅट खात्यांच्या संख्येच्या सीडीएसएलचा बाजारपेठेत मोठा हिस्सा आहे, असेट अंडर कस्टडी (एयूसी)च्या बाबतीत एनडीएसएल जास्त मोठी आहे. ऑगस्टअखेर सीडीएसएल ३.८५ कोटी रुपयांच्या एयूसीच्या ७.१६ कोटी डिमॅट खात्यांचे संचालन करत होती.

2000 नंतर दर महिन्याला सरासरी 20 लाख डिमॅट खाती उघडली

  • वर्ष जाने-मार्च एप्रिल-जून जुलै-सप्टे. ऑक्टो-डिसें
  • 2020 4.09 4.32 4.66 4.98
  • 2021 5.51 6.22 7.03 8.06
  • 2022 8.97 9.65 10.05 (ऑगस्टपर्यंत)

(डिमॅट खात्यांची संख्या कोटीत)

जास्त परताव्यासाठी जोखीम घ्यायला घाबरत नाहीत
1. एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च हेड एस रंगनाथन यांच्या मते, देशात डिमॅट अकाउंट ज्या वेगाने वाढले, यावरून तीन चिन्हे दिसतात.
2. आव्हानात्मक परिस्थितीत सर्वसामान्यांचा शेअर बाजारावरील विश्वास वाढला. देशातील १० कोटी लोक घरगुती बचतीसाठी इक्विटीला गुंतवणुकीचे प्रभावी साधन मानत आहेत.
3. गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी जोखीम पत्करण्यास तयार असतात. आता जग महागाई, वाढते व्याजदर आणि आर्थिक मंदीने ग्रासले आहे, अशा वेळी डिमॅट खाती वाढली आहेत.

बातम्या आणखी आहेत...