आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Denominations । GST । RERA Boosted Confidence In The Housing Sector; 80% Reduction In The Use Of Black Money In The Housing Sector In 5 Years

सुधारणा:नोटाबंदी, जीएसटी, रेरामुळे गृहनिर्माण क्षेत्रावरील विश्वास वाढला; 5 वर्षांत गृहनिर्माण क्षेत्रात काळ्या पैशाच्या वापरात 80 टक्क्यांची घट

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोटाबंदीपूर्वीच्या नवीन लाँचच्या तुलनेत विक्री वाढली, इन्व्हेंटरीत घट

नोटाबंदीनंतर देशातील गृहनिर्माण क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २०१६ च्या अखेरीपासून देशातील गृह बाजारातील काळ्या पैशाचा वापर ७५-८०% कमी झाला आहे आणि इन्व्हेंटरी कमी झाली आहे. नोटाबंदीच्या आधीच्या तुलनेत नवीन लाँचपेक्षा विक्री अधिक वाढली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फर्म अॅनारॉकच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार २०१६ मध्ये रेराची अंमलबजावणी झाली आणि त्याच वर्षात ८ नाेव्हेंबर २०१६ राेजी नाेटाबंदीची घाेषणा झाली. त्यानंतर जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी करण्यात आली. या सगळ्या गाेष्टींचा स्थावर मालमत्ता क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला. २०१३ पासून २०१६ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत ७ माेठ्या शहरांमध्ये १६.१५ लाख घरांसह नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

त्या तुलनेत ११.७८ लाख घरांची विक्री झाली. पण २०१६ च्या चौथ्या तिमाहीपासून ते २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान या शहरांमध्ये ९.०४ लाख घरांच्या विक्रीच्या तुलनेत १०.३७ लाख घरांची विक्री झाली. अॅनारॉक ग्रुपचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटी आणि रेरामुळे गृहनिर्माण क्षेत्र एका प्रकारे स्वच्छ झाले आहे. बहुतांश त्रुटी दूर करण्यात आल्याने या बाजारपेठेतील ग्राहकांचा विश्वास पुन्हा निर्माण झाला.

याचदरम्यान आलेल्या काेविड महामारीमुळे लाेकांना आपल्या स्वत:च्या घराचे महत्त्व समजले. त्यामुळे घरांच्या विक्रीमध्ये वेगाने वाढ झाली.अहवालानुसार, नोटाबंदीचा नवीन घरांपेक्षा जुन्या घरांच्या बाजारावर जास्त परिणाम झाला. कारण जुनी घरे आणि आलिशान घरांच्या विभागात रोख व्यवहाराचे प्रमाण जास्त आहे. अशाच व्यवहाराला नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका बसला.

नाेटाबंदीचा परिणाम

  • ब्रँडेड विकासक व स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नाेंदणीकृत कंपन्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांची मागणी वाढली
  • राेखीच्या व्यवहारावर अवलंबून असणारे लहान-माेठे विकासक बाहेर फेकले गेले.
  • रेरा , जीएसटी बदलांमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात पारदर्शकता आली. कमी किमतींवर सरकारचा भर पाहून बड्या विकासकांनी स्वस्त, मध्यम-विभागातील घरांवर लक्ष केंद्रित केले.
बातम्या आणखी आहेत...