आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC च्या IPO मध्ये करा गुंतवणूक:आज सुरू होतोय LIC चा IPO, 9 मे पर्यंत संधी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा IPO आज म्हणजेच 4 मे रोजी उघडला आहे. सरकार IPO द्वारे LIC मधील 3.5% भागिदारी विकणार आहे. यातून 21,000 कोटी रुपये उभे करण्याची सरकारची योजना आहे. जर तुम्हीही यामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला यात किती आणि कशी गुंतवणूक करू शकता तेच या बातमीच्या माध्यमातून सांगत आहोत.

एखादी व्यक्ती किमान आणि कमाल किती रक्कम गुंतवू शकते?

किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 15 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. त्यानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांना 45 रुपयांच्या सवलतीनंतर किमान 13,560 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कमाल मर्यादा 14 लॉट आहे, म्हणजे 210 शेअर्स. गुंतवणूकदार कमाल 1,89,840 रुपये गुंतवू शकतात. त्याचप्रमाणे, पॉलिसीधारक 60 रुपयांच्या सवलतीनंतर किमान 13,335 रुपये आणि कमाल 1,86,690 रुपये गुंतवू शकतात. तथापि, पॉलिसीधारक आणि कर्मचार्‍यांना देखील अतिरिक्त फायदा आहे.

यात कोणत्या प्रकारची सूट मिळतेय का?

एलआयसीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 45 रुपयांची सूट ठेवली आहे. तुम्ही अप्पर बँडवरील एका लॉट शेअर्ससाठी अर्ज केल्यास, 949 रुपये प्रति शेअरऐवजी, तुम्हाला प्रति शेअर 904 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच एका लॉटसाठी तुम्हाला 14,235 ऐवजी केवळ 13,560 रुपये मोजावे लागतील.

जर तुमच्याकडे LIC पॉलिसी असेल तर तुम्हाला 60 रुपयांची सूट मिळेल. तुम्ही पॉलिसी धारक कोट्यातून अपर बँडमधील एका लॉट शेअर्ससाठी अर्ज केल्यास, तुम्हाला प्रति शेअर 889 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच एका लॉटसाठी तुम्हाला 14,235 ऐवजी 13,335 रुपये द्यावे लागतील.

डिमॅट खाते असणे आवश्यक आहे का?

सेबीच्या नियमांनुसार, कोणत्याही कंपनीचे इक्विटी शेअर्स केवळ डिमॅट स्वरूपात जारी केले जातात. त्यामुळे कोणीही, मग ते पॉलिसीधारक असोत किंवा किरकोळ गुंतवणूकदार असो, त्यांच्याकडे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे.

अप्लाय कसा करावा?

यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अप्लाय करू शकता. जर तुम्हाला ऑनलाइन अप्लाय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या डीमॅट खात्याद्वारे किंवा त्याच्या अॅपद्वारे IPO साठी अप्लाय करू शकता. येथे तुम्हाला 3 पर्याय दिसेल.

  1. किरकोळ
  2. पॉलिसी धारक
  3. कर्मचारी

तुम्हाला ज्या श्रेणीसाठी अप्लाय करायचा आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या लॉटची संख्या भरा. यानंतर लॉटच्या किमतीचे पैसे तुमच्या खात्यातून काढले जातील (ब्लॉक केले जातील). अशा परिस्थितीत, 12 मे रोजी, जर तुम्हाला शेअर वाटपामध्ये शेअर्स मिळाले, तर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील आणि 16 मे रोजी शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात येतील. यानंतर, LIC चा स्टॉक 17 मे रोजी बाजारात सूचीबद्ध होईल.

दुसरीकडे, जर तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत, तर तुमचे पैसे अनब्लॉक करण्याची प्रक्रिया 13 मे पासून सुरू होईल. अशा परिस्थितीत, तुमचे पैसे 1-2 दिवसात अनब्लॉक केले जातील. दुसरीकडे, जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला एलआयसी ऑफिस किंवा तुमच्या डीमॅट खाते कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.

कोणत्या किंमतीवर गुंतवणूक करावी ?

LIC च्या IPO ची किंमत 904-949 रुपये आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी हायर बँड रु. 949 वर पैसे गुंतवले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...