आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Devika Bulchandani I  CEO Of Ogilvy I Joins The List Of CEOs Of Indian Origin I Latest News And Update 

आणखी एका जागतिक कंपनीत भारतीय सीईओ:अमृतसरमध्ये जन्मलेल्या देविका बुलचंदानी बनल्या ओगिल्वी कंपनीच्या वर्ल्ड सीईओ

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावरील जाहीरात आणि जनसंपर्क संस्था असलेली ओगिल्वीच्या (Ogilvy) सीईओपदी भारतीय वंशाच्या देविका बुलचंदानी यांची जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

बुलचंदानी या अँडी मेनचे स्थान घेतील. त्या ग्लोबल सीईओ पदावरून पायउतार होत आहेत. तर वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतील, अशी माहिती कंपनीने त्यांना एका निवेदनात दिली आहे. देविका बुलचंदानी सध्या ओगिल्वी नॉर्थअमेरिकेचे ग्लोबल प्रेसिडेंट आणि सीईओ म्हणून काम करत आहेत.

93 देशांमध्ये 131 कार्यालयांची उपलब्धी
वेदिका बुलंचदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ओगिल्वी कंपनी 93 देशांमधील 131 कार्यालयांच्या कामावर देखरेख ठेवणार आहे. ओगिल्वी लीडिंग मार्केटिंग आणि कम्युनिकेशन ग्रुप हा WPP चा भाग आहे. कंपनीने सांगितले की, बुलचंदाणी या WPP च्या कार्य समितीमध्ये देखील सामील होतील. डब्ल्यूपीपीचे सीईओ मार्क रीड म्हणाले, "देविका या सर्जनशीलतेची चॅम्पियन आहे. ते पुढे म्हणाले की, त्यांचे उद्योगावरील प्रेम, ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि एजन्सी आणि ब्रँडसाठी वाढीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहीला आहे. देविका बुलचंदाणी या ओगिल्वीला आणखी मोठ्या यशापर्यंत नेण्यासाठी योग्य पर्याय बनवेल.

अमृतसरमध्ये जन्म, 26 वर्षांपासून महत्त्वकांक्षी पदावर कार्यरत

अमृतसरमध्ये जन्मलेल्या बुलचंदानी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून मास्टर्स केले. मॅककॅन या उत्तर अमेरिकन जाहीरात एजन्सीमध्ये विविध नेतृत्व भूमिकांमध्ये 26 वर्षे काम केले. त्या कंपनीच्या अध्यक्षाही होत्या. त्या इंडस्ट्रीत देव या नावाने प्रसिद्ध आहे.

फियरलेस गर्लच्या लॉन्चिंगमध्ये बुलचंदानींचा सहभाग
मास्टरकार्डच्या दीर्घकाळ चाललेल्या "अमूल्य" मोहिमेमागे तसेच 2019 मध्ये सुरू झालेल्या "ट्रू नेम" या वैशिष्ट्यामागील प्रेरक शक्ती होती. तिने महिला समानतेचे प्रतीक असलेल्या "फिअरलेस गर्ल" लाँच करण्यात मदत केली. ही एक मोहीम होती जी कान लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटीच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित मोहिमांपैकी एक बनली.

मायक्रोसॉफ्ट ते गुगलपर्यंत भारतीय सीईओ
गेल्या आठवड्यात, कॉफी दिग्गज स्टारबक्सने लक्ष्मण नरसिंहन यांची मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती केली. या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अडोबचे सीईओ शांतनु नारायण, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल, चॅनेलचे लीना नायर आणि आयबीएम ग्रुपचे सीईओ अरविंद कृष्णा यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...