आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवाशाकडे वैध तिकीट असूनही एअर इंडियाने प्रवाशाला विमानात प्रवास करण्यास नकार दिला. वैध बोर्डिंग पास असूनही नुकसान भरपाई न दिल्याबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कंपनीला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
यासोबतच आज DGCA ने एअरलाईन्ससाठी नवीन नियमही जारी केला आहे. यानुसार, वैध तिकीट असूनही एखाद्या प्रवाशाला प्रवास करण्यास थांबवल्यास विमान कंपन्यांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करावी लागेल किंवा त्या प्रवाशाला नुकसान भरपाई द्यावी लागेल.
आता प्रवाशांना 20 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई
डीजीसीएने सांगितले की, जर एअरलाइन्सने वैध तिकीट असलेल्या प्रवाशासाठी 1 तासात दुसर्या फ्लाइटची व्यवस्था केली तर कोणताही दंड लागणार नाही. त्याच वेळी, प्रवाशाला 24 तासांत त्यांच्या प्रवासाची व्यवस्था न केल्याबद्दल 20,000 पर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल. मात्र, जर 24 तासांच्या आत एअरलाइन्सने प्रवाशांची दुसऱ्या फ्लाइटमध्ये व्यवस्था केली, तर ही भरपाई फक्त 10,000 हजार रुपये द्यावी लागेल.
DGCA ने एअर इंडियाला समस्या सोडवण्याचा दिला सल्ला
या प्रकरणाबाबत डीजीसीएने सांगितले की, हे प्रकरण समोर आल्यानंतर तपास करण्यात आला. भविष्यात अशा घटना समोर येऊ नयेत यासाठी डीजीसीएने एअरलाईनला ताबडतोब समस्येचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास DGCA पुढील कारवाई करेल.
एअर इंडियाआधी विस्तारालाही ठोठावला होता दंड
एअर इंडियापूर्वी 2 जून रोजी विस्ताराला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. कंपनीवर सुरक्षेचे नियम मोडल्याचा आरोप होता. डीजीसीएने सांगितले की, आवश्यक प्रशिक्षणाशिवाय विस्तारा एअरलाइन्स अधिकाऱ्याला टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी मंजुरी देत असे. त्यामुळे कंपनीला दंड ठोठावण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.