आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Diesel Prices Go Up By Rs. 1, Why Do Commodity Prices Rise In The Market? | Marathi News

7 रुपये किलोचा बटाटा 17 रुपये किलोने का मिळतो?:डिझेल 1 रुपयांनी महागल्याने बटाटा 21 रुपये किलो पर्यंत कसा पोहोचतो, समजून घ्या संपूर्ण गणित

सुनाक्षी गुप्ता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होतो. भारतात निवडणुकीचे वातावरण असल्याने साडेचार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. आता तेल कंपन्यांनी ठोक डिझेलच्या दरात प्रतिलिटर 28 रुपयांची वाढ केली आहे. तर सर्वसामान्यांसाठी मंगळवारनंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी 80-80 पैशांची वाढ झाली आहे. तेलाच्या किमती 20 रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इतर दैनंदिन गोष्टींव्यतिरिक्त डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दराचा परिणाम थेट घराच्या स्वयंपाकघरावर होतो. बटाटा ही बहुतेक घरांमध्ये वापरली जाणारी भाजी आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या किमती अजिबात वाढल्या नाहीत तरीही बटाटा तुमच्या ताटात पोहोचेपर्यंत दुप्पट महाग होतो.

शेतातून ताटापर्यंत येता-येता बटाट्यावर 10 रुपये खर्च होतात

सुधीर मिश्रा हे फार्रुखाबाद जिल्ह्यातील सियानी गावात गेल्या 30 वर्षांपासून बटाट्याची शेती करत आहेत. 20 गुंठे जमिनीवर एका वेळी सुमारे 2 ते 2.5 क्विंटल बटाटे उत्पादीत होतात. हा बटाटा पिकवण्यापासून ते बाजारात पोहोचेपर्यंत सुमारे 8 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये शेत तयार करणे, बियाणे पेरणे, ट्रॅक्टर, पॅकिंग आणि बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा खर्च समाविष्ट आहे. अशाप्रकारे 1 किलो बटाटा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला सुमारे 4 रुपये खर्च येतो. शेतकरी सध्या 6 ते 7 रुपये किलोने बटाटा विकत आहेत.

डिझेलमध्ये 1 रुपयाने वाढ झाल्याने दर चारपट वाढतात
समजा, डिझेलच्या दरात लिटरमागे 1 रुपयांनी वाढ झाली, तर लगेचच तुमच्या स्वयंपाकघरात येणाऱ्या बटाट्याची किंमत साधारणतः चार पटीने वाढेते. प्रथम - शेतातून छोट्या बाजारपेठेत आणि छोट्या बाजारातून मोठ्या बाजारपेठेत जाणे. दुसरे- बटाटे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणे. तिसरे- बटाटे पेरणी आणि खोदण्याच्या खर्चावर. चौथे- भाज्या साफ करताना किंवा उचलण्याची मजूरी.

चला तर जाणून घेऊया डिझेलच्या दरात 1 रुपया प्रति लिटरची वाढ झाली तर कसे आणि किती बदलात, बटाट्याचे दर...

प्रथम- तेलाच्या किमती वाढल्या की वाहतुकीचा खर्च वाढतो

जयपूरचे ट्रान्सपोर्टर जितेंद्र सांगतात की, फर्रुखाबाद मंडी ते जयपूर मंडीपर्यंत 50 क्विंटल बटाटे नेण्यासाठी ते सध्या 20 हजार रुपये प्रवास खर्च घेतात. यामध्ये मार्गावरील टोल आणि डिझेल दोन्हीचा समावेश आहे. त्यानुसार एक किलो बटाट्याची वाहतूक करण्यासाठी सुमारे 4 रुपये खर्च येतो. दरम्यान, ट्रक उतरवण्याची जागा बाजारात न मिळाल्यास काही दिवस थांबावे लागते. जितेंद्र स्पष्ट करतात की, डिझेलचा दर एक रुपयानेही वाढला तर एका फेरीत भाडे सुमारे 2000 रुपयांनी वाढते. डिझेल 1 रुपयांच्या वाढीमुळे 475 किलोमीटर अंतरात 1 किलो बटाट्याची किंमत 4.40 रुपये झाली. जयपूरमध्ये किरकोळ भाजीपाला विकणारे अशोक सांगतात की, जयपूर जवळच्या बाजारातून 10 किमी अंतरावर असलेल्या त्याच्या दुकानात भाजी आणण्यासाठी 50 किलोच्या पोत्यासाठी 25 रुपये मोजावे लागतात. म्हणजेच सुमारे 50 पैसे प्रति किलो भाड्यात जातात. डिझेलचे दर वाढले की त्यांना एका फेरीसाठी 30 रुपये मोजावे लागतात. त्यानुसार बाजारापर्यंत 1 किलो बटाट्याचे भाडे 60 पैसे होते.

दुसरे- कोल्ड स्टोरेजचे भाडे वाढ
फर्रुखाबादच्या 'अंदाज कोल्ड स्टोरेज'चे संचालक मनोज चतुर्वेदी सांगतात की, डिझेलच्या किमती जसजशा वाढतात तसतसे स्टोरेजचे भाडेही वाढते. कारण कोल्ड स्टोरेजमध्ये 24 तास वीजपुरवठा सुरू ठेवावा लागतो. अनेक ठिकाणी वीज जाते. अशा स्थितीत जनरेटर चालवून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा लागतो. डिझेलचे दर वाढल्याने बटाट्याचे पाकीट ठेवण्याचे भाडे 5 ते 10 रुपयांनी वाढते. म्हणजेच एका पॅकेट साठवण्याचा दर 135 रुपये होतो.
बटाटे साठवण्यासाठी 2.5 रुपये तर कांदा साठवण्यासाठी 5 रुपये प्रति किलो खर्च
कृषीक्षेत्रातील कंपनी 'एएस अॅग्री अँड अॅक्वा एलएलपी'चे मुंबईतील उत्तर विभाग अध्यक्ष आणि कृषी संशोधक डॉ. जीत सिंह यादव यांनी सांगितले की, वेगवेगळ्या भाज्या कोल्ड स्टोरेजमध्ये 1 ते 12 महिने ठेवल्या जातात. फळे आणि भाजीपाल्यांच्या परिपूर्ण साठवणुकीसाठी त्यांना 40 अंश ते 10 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावे लागते. सोनपतमधील कोल्ड स्टोरेज ऑपरेटर अजित डांग सांगतात की, बटाटे कोल्ड स्टोअरमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात येतात आणि ते ऑक्टोबरपर्यंत 1 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवावे लागतात. एका हंगामासाठी 50 किलो बटाटे साठवण्यासाठी 130 रुपये खर्च येतो. कांदा मे महिन्याच्या अखेरीस येतो आणि तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत शून्य अंश सेल्सिअस तापमानात साठवला जातो. एका हंगामासाठी 100 किलो कांदा साठवण्यासाठी 50 रुपये खर्च येतो. बाकीच्या भाज्या वेगळ्या बॉक्समध्ये साठवल्या जातात. त्यासाठीचा दर 3 ते 4 रुपये किलो आहे.

बाजारात आलेल्या बटाट्याबाबत असे होते. डिझेलचे दर वाढल्याने बटाटा पिकवण्याच्या खर्चातही फरक पडतो. चला, कसे ते समजून घेऊ.

तिसरे - म्हणजे डिझेलचे दर वाढल्याने शेतातच भाजीपाला महाग होतो
याबाबत आम्ही दुसऱ्या शेतकऱ्याशी चर्चा केली. यावेळी आमचा शेतकरी पप्पन होता, हे दिल्लीतील तिग्गीपूर गावात बटाट्याची शेती करतात. डिझेल महागल्याने शेतीची मशागत किंवा नांगरणी महाग होते. एक एकर शेत नांगरण्यासाठी 600 रुपये खर्च होतात. संपूर्ण नांगरणीसाठी सुमारे 2500 रुपये खर्च येतो. डिझेलच्या दरात 1 रुपयाने वाढ झाल्यावर एकवेळच्या मशागतीत 50 ते 100 रुपयांनी आणि पूर्ण नांगरणीमध्ये 400 रुपयांपर्यंत वाढ होते. यानंतर एक एकर बटाटा उत्खननात कंबाईन हार्वेस्टर मशीन चालवण्यासाठी 1500 रुपये मोजावे लागतात. डिझेलचे दर वाढले तर हार्वेस्टर मशीनच्या खर्चात 500 रुपयांपर्यंत वाढ होते. म्हणजेच आधी भाजीपाला घेण्यासाठी उत्पादन खर्च 3 ते 4 रुपयांवरुन 5 ते 6 रुपयांवर जातो.

चौथे- भाजीपाला स्वच्छ करणाऱ्यासाठी लागणाऱ्या खर्चानेही वाढतात दर

दिल्लीच्या गाझीपूर मंडीचे सचिव प्रशांत तन्वर सांगतात की, जवळच्या मंडईत भाज्या प्रथम येतात. येथून काही भाज्या मोठ्या मंडईत पोहोचतात. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने बाजारात भाजीपाला साफ करण्याचा खर्चही वाढतो. अंडरग्राउंड वॉशिंग मशिनचा थेट संबंध डिझेलवर चालणाऱ्या मोटरशी असतो. दिल्लीच्या पल्ला गावात मुळा पिकवणारे राहुल तन्वर सांगतात की, न धुतलेला मुळा 2 रुपये किलो दराने विकला जातो मात्र, जर मुळा साफ केलेला असेल तर 3॰5 रुपये किलो दराने दर आकारला जातो. डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे मोटारचा खर्च वाढतो. भाजीपाला धुण्याचा खर्च सुमारे 1 ते 1.5 रुपयांनी वाढतो. प्रत्येक भाजीनुसार हे वेगवेगळे दर आहेत. काही भाज्या बराच वेळ धुतल्यानंतर स्वच्छ होतात, तर काहींना थोड्या वेळासाठीच मोटार चालवावी लागते.

डिझेल एक रुपयाने महागल्यास 1 किलो बटाट्याचे दर 3.50 रुपयांनी वाढतील, याला असे समजून घ्या.

  • बटाटा शेतातून बाजारात आणण्यासाठी 50 पैसे मोजावे लागतात. तसेच एका मार्केटमधून दुसऱ्या मार्केटमध्ये आणि मार्केटमधून मार्केटमध्ये गेल्यावरही वाहतुकीचे शुल्क वाढते.
  • शीतगृहात 25 पैसे किलोने भाजीपाला ठेवणे महाग होते.
  • भाजीपाल्याच्या उत्पदन खर्चात 2 रुपयांची वाढ होते.
  • वॉशिंगमध्ये दीड रुपये वाढ

म्हणजेच 17 रुपये किलोने मिळणारा बटाटा तुम्हाला 20-21 रुपये किलो मिळेल.

गतवर्षीपेक्षा कमी दराने बटाट्याची विक्री

फर्रुखाबाद येथील शेतकरी सुधीर मिश्रा सांगतात की, गेल्या वर्षी त्यांनी 50 किलो बटाट्याची पोती 400 ते 500 रुपयांनी विकली होती, जी यंदा 300 ते 350 रुपयांना विकली जातेय. म्हणजेच गतवर्षी 8-10 रुपये किलोने विकत घेतलेला बटाटा यंदा 6-8 रुपये किलोने विकत घेतला जात आहे. ऑक्‍टोबर 2020 मध्ये देशभरात कोरोनामुळे बाजारावर परिणाम झालेला असताना, व्यापाऱ्यांनी कोल्‍ड स्टोअरमधील बटाटे 1500 रुपये प्रति क्‍विंटलने विक्री केले होते. फर्रुखाबाद बाजारातील एजंट राजू कुरवली सांगतात की, सध्या बाजारात बटाट्याचा दर 600 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल आहे. यामध्ये विविध आकाराच्या आणि दर्जाच्या बटाट्यांचा समावेश आहे. राजू स्पष्ट करतात की फर्रुखाबादमध्ये पिकवलेला बटाटा छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यांतील बाजारात जातो. या हंगामात जयपूर बाजारात 10 ते 12 रुपये किलो दराने मोठ्या प्रमाणात बटाट्याची खरेदी केली जात आहे.

आशियातील सर्वात मोठे भाजी मार्केट आझादपूर, येथून भाजीपाला संपूर्ण उत्तर भारतात जातो

दिल्लीतील आझादपूर मंडी ही देशातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठी भाजीपाला-फळांची बाजारपेठ आहे. आझादपूर मंडीचे चेअरमन आदिल खान म्हणाले की, एका दिवसात 50 हजार ते 1 लाख शेतकरी आणि खरेदीदार आझादपूर भाजी मार्केटला भेट देतात. भाजीपाला व फळे खरेदी-विक्री करणारे साडेतीन हजारांहून अधिक आहत आहेत. येथे दररोज चार ते पाच हजार ट्रक शेतकऱ्यांची फळे व भाजीपाला येतो. सध्या हिमाचल आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी, बाराबंकी, सीतापूर, उन्नाव, कानपूर, फैजाबाद येथून टोमॅटोची आवक होत आहे. त्याचबरोबर नाशिक, राजस्थान, हरियाणा, इंदूर आणि पंजाबमधून कांद्याची आवक होत आहे. चंबळ, यूपी आणि हरियाणामधून बटाट्याची आवक होत आहे. आझादपूर मंडीतील भाजीपाला उत्तर भारतातील विविध भागात जातो.

बातम्या आणखी आहेत...