आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Digital Payment ; KYC ; Mobile Wallet ; Now You Can Withdraw Money From ATM Through Mobile Wallet, Security Will Be Available On KYC

डिजिटल पेमेंट:आता तुम्ही मोबाईल वॉलेटद्वारे एटीएममधून काढू शकाल पैसे, KYC अपडेट केल्यास मिळेल सुविधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशाप्रकारे एटीएममधून काढता येतील पैसे

डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल वॉलेटमधून रोख रक्कम काढण्यास आणि मर्चंट पेमेंट्सची परवानगी दिली आहे. येत्या काळात मोबाइल वॉलेटमधून पेमेंटशिवाय फंड ट्रान्सफर आणि फंड रिसीव्हिंगदेखील करता येईल.

अशाप्रकारे एटीएममधून काढता येतील पैसे

पे वर्ल्ड मनी (Payworld Money) या पेमेंट कंपनीचे डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रवीण धाभाई यांच्या म्हणण्यानुसार, मोबाइल वॉलेट कंपन्या आपल्या ग्राहकांना प्रीपेड कार्ड देतील. हे कार्ड वापरुन ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतील आणि दुकानांमध्ये कार्ड स्वाइपदेखील करू शकतील. पे वर्ल्ड मनीकडे मोबाइल वॉलेट देखील आहे.

2018 मध्ये मोबाइल वॉलेटसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली होती
ऑक्टोबर 2018 मध्ये, आरबीआयने मोबाइल वॉलेटसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानंतर वॉलेटला यूपीआयमार्फत पैसे हस्तांतरित करण्याची आणि RuPay आणि व्हिसा नेटवर्कवर प्रीपेड कार्ड देण्याची परवानगी होती. आतापर्यंत, ते पर्यायी होते आणि केवळ काही जणच त्याचा वापर करत होते. परंतु अलीकडील आर्थिक धोरणात रिझर्व्ह बँकेने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) इंटरऑपरेबल असणे अनिवार्य केले आहे.

अधिसूचनेनुसार, इंटरऑपरेबिलिटी 3 टप्प्यांत असेल. प्रथम, वॉलेटचा UPI मध्ये समावेश केला जाईल. दुसरे म्हणजे, वॉलेटला UPI चा वापर करून बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाईल. तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात पीपीआयना कार्ड देण्याची परवानगी दिली जाईल. प्रवीण धाभाई यांच्या म्हणण्यानुसार, वॉलेट यूजर्स सध्या बँकाद्वारे उपलब्ध केलेल्या आधार इनेबल पेमेंट सिस्टम (एईपीएस) वापरू शकत नाहीत. कारण बहुतेक यूजर त्यांचे वॉलेट आधारशी लिंक करत नाहीत.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी KYC (Know Your Customer) अपटेड करणे आहे आवश्यक
ज्यांनी KYC चे सर्व मानक पाळले आहेत त्यांना मोबाइल वॉलेट या सुविधेचा लाभ घेता येईल. पीपीआय बँक खाते म्हणून त्याचा वापर करण्यापूर्वी KYC अपडेट करावे लागेल आणि त्यामध्ये सर्व आवश्यक तपशील द्यावा लागेल. अ‍ॅड्रेस प्रूफची पडताळणी करणे सर्वात महत्त्वाचे ठरेल व व्हिडिओ KYC किंवा व्यक्तिगत व्हेरिफिकेशननंतर ही सुविधा उपलब्ध होईल.

मोबाइल वॉलेट म्हणजे काय?
हे आपल्या स्मार्टफोनमधील एक व्हर्च्युअल वॉलेट आहे, ज्यात पैसे डिजिटल मनीच्या रुपात जमा केले जातात. म्हणजेच ही एक डिजिटल पर्स आहे ज्यातून आपण पैसे काढून पैशाचे व्यवहार आणि पेमेंट करू शकता. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोबाइल वॉलेट योग्य मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...