आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Divided Into Two Factions With IT Industry Premji Krishnan Against, Stalwarts Like Pai In Favor Of Moonlighting

दोन गटांत विभागला आयटी उद्योग:प्रेमजी-कृष्णन विरोधात, तर पैसारखे दिग्गज मूनलायटिंगच्या बाजूने

बंगळुरू5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूनलायटिंग करताना सापडलेल्या विप्रोच्या सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर आयटी क्षेत्रात हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मोहनदास पै आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक कृष गोपाल कृष्णन सारखे दिग्गज या मुद्द्यावर समोरासमोर आले आहेत. मूनलायटिंग म्हणजे एका कंपनीत काम करताना एखाद्या दुसऱ्या कंपनीसाठीही काम करणे. कोरोना महामारीच्या वेळी वर्क फ्रॉम होम करताना अनेक कर्मचाऱ्यांनी ही पद्धती स्वीकारली. विशेषत: आयटी क्षेत्रात हा ट्रेंड सर्वाधिक दिसून आला. कोटक इन्स्टिट्यूशनच्या ताज्या सर्व्हेत सहभागी आयटी उद्योगाशी संबंधित ४०० जणांपैकी सुमारे ६५% लोकांनी स्वीकारले की, ते स्वत: मूनलायटिंग करत आहेत किंवा अशा लोकांना ओळखतात जे मूनलायटिंग करतात.या आधी विप्रोचे कार्यकारी चेअरमन अझिम रिषद प्रेमजी यांनी मूनलायटिंगला विश्वासघात ठरवत अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून त्याला विरोध केला होता. त्यानंतर इन्फोसिसनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना मूनलायटिंग करण्याविरोधात इशारा दिला. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना नाेकरीवरून काढण्याची धमकीही दिली होती. मूनलायटिंगबाबत नैतिकता आणि वैधतेबाबत चर्चा सुरू झाली.

हे दिग्गज विरोधात कृष गाेयल कृष्णन इन्फोसिसच्या सहसंस्थापकांनी सांगितले की, एका वेळी एकापेक्षा जास्त कंपन्यांसाठी काम केल्याने विश्वास संपतो. नियमित कामाच्या वेळेनंतर दुसरी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता प्रभावित होईल.

रिषद प्रेमजी विप्रोच्या कार्यकारी चेअरमनना वाटते की, मूनलायटिंग करणारे कर्मचारी एक प्रकारे त्या दोन्ही कंपन्यांना फसवतात जेथे ते काम करतात. कोणत्याही स्थितीत ही पद्धत स्वीकारली जाऊ शकत नाही.

हे दिग्गज बाजूने मोहनदास पै इन्फोसिसच्या माजी संचालकांनी मूनलायटिंगला फॅक्ट ऑफ लाइफ म्हटले आहे. त्यांनी गुरुवारी सांगितले, जर मला जास्त पैसे हवे असतील तर मी शनिवारीही काम करेन. ते मला असे करण्यापासून रोखू शकत नाहीत.

सीपी गुरनानी टेक महिंद्राच्या सीईओंना वाटते की, आपल्या क्षमतेचा वापर करून जास्त कमाई करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार आहे. मात्र हे काम पारदर्शकपणे केले जायला हवे.

बातम्या आणखी आहेत...