आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुंतवणुकीच्या दृष्टीने काही चांगल्या सरकारी कंपन्यांचे शेअर वाढो अथवा न वाढो, त्यांच्या लाभांशाद्वारेच बँक एफडीपेक्षा अधिक कमाई होत आहे. एमएमडीसी, आरईसी व गेलसारख्या ६ कंपन्यांचा ५ वर्षांतील सरासरी लाभांश ९.१ ते १२.३% आहे. त्या तुलनेत सध्या एफडीवर जास्तीत जास्त ७.५५% परतावा मिळतोय. आयडीबीअाय कॅपिटलच्या एका अहवालानुसार, त्याव्यतिरिक्त ९ कंपन्या अशा आहेत, ज्या वर्षाला ५.६ ते ७.१ % व्याज देतात. एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन यांनी म्हटले की, अधिक लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा दुसरा फायदाही आहे. त्यांच्यात चढ-उतार कमी असतो. विदेशी गुंतवणूकदार व म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणूकदार संस्था त्यांच्यापासून दूर राहतात. यात किरकोळ गुंतवणूकदार बाजारातील चढ-उतारानुसार निर्णय घेत नाहीत.
काही पीएसयूच्या मोठ्या लाभांशाची तीन कारणे 1. या कंपन्या सर्व खर्च भागवल्यानंतर प्रत्येक वर्षी जोरदार कमाई करत आहेत. 2. शेअर्सधारकांना नियमित लाभांश देत आहेत. त्याचा फायदा होतोय 3. या कंपन्या अधिक जबाबदार असतात, त्यामुळे त्या केवळ विस्तारीकरणावर लक्ष्य नसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.