आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचे जीएसटी संकलन दुपटीवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील महिना जीएसटी संकलनाच्या हिशेबाने चांगला ठरला. ऑक्टोबरमध्ये संकलन १.५२ लाख कोटी रुपयांच्या जवळ गेले. आतापर्यंतचे हे सर्वात मोठे जीएसटी संकलन ठरले. यापूर्वी या वर्षी एप्रलमध्ये १.६८ लाख कोटीचे विक्रमी जीएसटी संकलन झाले होते. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचे जीएसटी संकलन दुप्पट झाले. जीएसटी संकलनाचा ताजा आकडा २०२१च्या १.३० लाख कोटींपेक्षा १६.६ टक्के जास्त आहे. हा सलग आठवा महिना आहे, यात जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिले. दुसरीकडे ओव्हरऑल नवव्यांदा हा आकडा पार केला आहे.

अर्थ मंत्रालयाने मंगळवारी निवेदनात ही माहिती दिली. ऑक्टोबर २०२२ मध्ये जीएसटी संकलन १,५१,७१८ कोटी रुपये राहिले. यात सेंट्रल जीएसटी २६,०३९ कोटी रुपये, स्टेट जीएसटी ३३,३९६ कोटी रुपये आणि इंटिग्रेटेड जीएसटीची भागीदारी ८१,७७८ कोटी रुपये आहे. आयजीएसटीमध्ये वस्तूंच्या आयातीवर एकत्रित ३७,२९७ कोटी रुपयांची रक्कम आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये मासिक आधारावर ई-वे बिलांच्या संख्येत ७.८% वाढ झाली. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये ८.३ कोटी ई-वे बिल तयार झाले. ऑगस्टमध्ये ७.७ कोटी ई-वे बिल तयार झाले. आकड्यांचा विचार केला तर ६० लाख ई-वे बिले जास्त आहेत.

नोव्हेंबरमध्ये चांगल्या संकलनाची अपेक्षा ^ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनाच्या वाढीवरून गेल्या महिन्यात देवाण-घेवाणीशी संबंधित व्यवहार कळतात. सणासुदीच्या ऑक्टोबर महिन्यात ई-वे बिलांची संख्या अधिक होती. नोव्हेंबरमध्येही जीएसटी चांगला राहण्याची अपेक्षा. -अदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा

दरडोई संकलनात महाराष्ट्र दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर, बिहार दहाव्या राज्य संकलन लोकसंख्या रु./प्रति व्यक्ती कोटी रुपए कोटी संकलन हरियाणा 7,662 2.53 3028 महाराष्ट्र 23,037 11.23 2051 गुजरात 9,469 6.04 1568 झारखंड 2,500 3.29 760 पंजाब 1,760 2.77 635 राजस्थान 3,761 6.85 549 उत्तर प्रदेश 7,839 24.1 325 छत्तीसगढ 2,328 2.94 792 मध्य प्रदेश 2,920 7.26 402 बिहार 1,344 10.4 129 भारत 151718 121.08 1253 (नोट : 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येचे आकडे)

बातम्या आणखी आहेत...