आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशी विशेष:डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लान करत असाल तर यावर लागणाऱ्या टॅक्ससह इतर गोष्टींकडेही ठेवा लक्ष

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे किंवा गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. आजकाल लोक डिजिटल सोन्यात खूप गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही या धनत्रयोदशीला डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करू शकता. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींविषयी सांगत आहोत, ज्या तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

गुंतवणूक कुठे करायची हे लक्षात ठेवा
डिजिटल सोन्यात गुंतवणूकही अनेक प्रकारे करता येते. गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF), सॉवरेन गोल्ड बॉन्ड, गोल्ड म्युच्युअल फंड आणि पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते. म्हणूनच सोन्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती मिळवा. तुम्ही ज्या फर्ममध्ये गुंतवणूक करत आहात त्याबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

पारदर्शकता आणि रिअल टाइम अपडेट आवश्यक आहेत
जर तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याची योजना आखत आहात, तर गोष्टीकडे लक्ष ठेवा की, जिथे किंवा ज्या फर्ममध्ये तुम्ही पैसे लावत आहात, ती फर्म तुम्हाला पारदर्शकता आणि रिअल टाइम अपडेट देत आहे. कारण किमतीत केव्हा बदल होतो हे तुम्हाला लगेच कळले नाही तर तुम्हाला जास्त आणि योग्य नफा मिळू शकणार नाही.

यावर किती कर भरावा लागेल हे जाणून घ्या
सोन्याप्रमाणे, डिजिटल सोने खरेदीवर (गुंतवणूक) 3% GST भरावा लागेल. त्याच वेळी, त्याच्या विक्रीवरील कर देखील फिजीकल सोन्याप्रमाणेच आहे. जर तुम्ही सोने खरेदी केल्यापासून 3 वर्षांच्या आत विकले असेल तर तो अल्प मुदतीचा भांडवली नफा समजला जातो. या विक्रीतून मिळालेल्या नफ्यावर तुमच्या आयकर स्लॅबनुसार कर आकारला जातो. दुसरीकडे, 3 वर्षांनंतर सोने विकले गेले तर तो दीर्घकालीन भांडवली नफा समजला जातो. यावर 20.8% टक्के कर भरावा लागतो.

किती गुंतवणूक करायची ते जाणून घ्या
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी आणि चलन) अनुज गुप्ता सांगतात की, तुम्हाला जरी सोन्यात गुंतवणूक करणे आवडत असले तरी तुम्ही त्यात मर्यादित रक्कमच गुंतवावी. एकूण पोर्टफोलिओपैकी फक्त 10 ते 15% सोन्यात गुंतवणूक करावी. सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या पोर्टफोलिओला संकटाच्या वेळी स्थिरता मिळते, परंतु यामुळे दीर्घकाळात तुमच्या पोर्टफोलिओचा परतावा कमी होऊ शकतो.

सोन्याने गेल्या 10 वर्षात 80% परतावा दिला
सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 10 वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2011 बद्दल बोलायचे तर, तेव्हा सोने 27,600 रुपये होते. म्हणजेच गेल्या 10 वर्षात सोन्याने 80% परतावा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...