आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:टू व्हीलर बाजारात दिवाळीची ‘धूम’, सर्वांना गाड्या मिळणार!

औरंगाबाद22 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबर महिन्यात विक्रीत 19 टक्के वाढ, शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक मागणी

दुचाकीच्या बाजारात नवरात्रीपासून निर्माण झालेले चैतन्य दिवाळीतही कायम राहणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दसऱ्यात दुचाकींची विक्री १९ टक्क्यांनी वाढली. आठ महिन्यांनंतर खुली झालेली बाजारपेठ, चांगला पाऊस आणि बोनस यामुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीला दुचाकीचा व्यवसाय २५ ते ३० टक्के अधिक होणार असल्याचा विक्रेत्यांना विश्वास वाटतो. विक्रेत्यांनी वाहनांचा स्टॉक करून ठेवल्याने दिवाळीत प्रत्येकाला मनपसंत गाडी मिळू शकेल.

कोरोनामुळे ठप्प झालेल्या दुचाकीच्या बाजाराने नवरात्रापासून जोरदार उसळी घेतली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, गतवर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आयात आणि निर्यात मिळून ३०८,१६१ दुचाकींची विक्री झाली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये ३८२,१२१ दुचाकी विकल्या गेल्या. यात २४ टक्के वाढ झाली असल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.

कोरोनानंतरचे पाच महत्त्वाचे ट्रेंड
बस-रिक्षाऐवजी स्वत:ची बाइक हवी
बेसिक, एंट्री लेव्हलच्या दुचाकींना पसंती
ग्रामीण भागातून अधिक मागणी
चांगल्या सस्पेन्शनच्या गाड्यांकडे कल
सेल्फ स्टार्ट , डबल डिस्क ब्रेक, अॅलाॅय व्हील्सकडे ग्राहक देताहेत लक्ष

ग्रामीण भागातून मागणी
हीरो मोटोकॉर्पचे डीलर आणि राज ऑटोचे संचालक हेमंत खिंवसरा म्हणाले, दसऱ्यामध्ये पावसामुळे शेतकरी वर्गाला इच्छा असतानाही गाडी नाही घेता आली. आता पाऊस संपलाय. कापसाला चांगला दर मिळालाय. हातात पैसे असल्याने ग्रामीण भागातून दुचाकी खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. शाळा, कॉलेज आणि काही प्रमाणात ऑफिस बंद असल्याने शहरात विक्री कमी आहे. ती कमतरता ग्रामीण भागातून भरून निघतेय. तरुणाईएेवजी नोकरदार वर्गाचा दुचाकी घेण्याकडे कल आहे. दुचाकीची ग्रामीण आणि शहराची बाजारपेठ ६०:५० अशी आहे.

शाॅर्टेज नसल्याने बुकिंगची गरज नाही
हेमंत खिंवसरा म्हणाले, आता पूर्वीप्रमाणे दुचाकीची अॅडव्हान्स बुकिंग होत नाही. लोक थेट येऊन खरेदी करतात. दसऱ्यात वाहनांचा शॉर्टेज झाला. तोच ट्रेंड कायम राहण्याच्या अंदाजाने जास्तीचा सर्वांनीच जास्तीचा स्टॉक मागवला. यामुळे प्रत्येकाला आवडीचे वाहन मिळेल. सुपर स्प्लेंडर, ग्लॅमर व माइस्ट्रोचा पुरवठाच कमी असल्याने त्यास वेटिंग असू शकते. स्वस्त झालेले वाहन कर्ज, बोनसचा पैसा यामुळे वाहनांना मागणी वाढेल.