आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यावसायिक फोटोग्राफी करण्याची जर तुमची आवड असेल आणि त्यासाठी तुम्ही महागडा ब्रँडेड कॅमेरा घेऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या मोबाइलच्या कॅमेरातूनही हे काम करू शकता. आता मोबाइलमध्ये अॅडव्हान्स फीचरचा कॅमेरा असतो. त्या कॅमेरातून तुम्ही चांगली छायाचित्रे काढू शकता. यासोबतच त्यातून चंगले पैसेही कमवू शकता. गेटी इमेज, शटर स्टॉक, आयस्टॉक आदी फोटो एजन्सी तुम्हाला एका फोटोसाठी २० ते ५० टक्के कमिशन देतात. मोबाइलच्या साह्याने व्यवसायिक फोटोग्राफी कशी केली जाऊ शकते हे समजून घ्या.
लेन्स स्वच्छ करायला विसरू नका
फोटो काढायच्या अगोदर सुती कापडाने कॅमेऱ्याची लेन्स व्यवस्थितपणे स्वस्छ करून घ्या, कारण लेन्स वरील धुळीच्या कणांमुळे फोटो स्पष्ट निघत नाही. ज्याचा फोटो घ्यावयाचा आहे त्यासाठी मोबाइलच्या स्क्रीनवर टॅप करून तुमचा फोकस पॉइंट निवडा.
फोटोशॉप किंवा लाइट रूम फ्री अॅपने फोटोत सुधारणा करा
अनेकवेळा असे होते की तुम्हाला हवा तसा फोटो क्लिक होत नाही. चांगली लाइटिंग आणि कलरिंगसाठी फोटोशॉप किंवा लाइटरूम फ्री अॅपची मदत घ्या. अॅप सेटिंगमध्ये जाऊन तुमच्या आवडीनुसार प्रोसेसिंग करू शकता.
फ्लॅशचा वापर करू नये
उत्कृष्ट फोटो काढायचा असेल तर फ्लॅशचा वापर करू नका. आवश्यकता असेल तर दुसऱ्या मोबाइलचा फ्लॅश ऑन करा. याशिवाय कॅमेरा झूम करण शक्यतो टाळले पाहिजे. कॅमेऱ्याच्या हॉरीझोंटल लाइनला ग्रीड लाइनच्या सोबत ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.