आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Do You Have To Get A New SIM For New 5G Service I Know Answers To Many Questions About The 5G Service I Latest News And Update,

5G सेवेसाठी नवीन सिमची गरज नाही:4G प्लॅनच्या तुलनेत 5G रिचार्ज किती महाग असेल? यासह काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अखेर रविवारपासून 5G सेवा कार्यान्वित झाली आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या माध्यमातून काही शहरांमध्ये 5G सेवा देण्यास सुरूवात केली आहे. 5G इंटरनेट वापरण्यासाठी नवीन सिम घ्यावे लागेल की नाही?, 5G इंटरनेटसाठी किती रिचार्ज करावे लागेल? यासह अशाच काही आणखी महत्त्वांचे प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत, जेणेकरून ग्राहकांच्या मनाचे समाधान होऊन त्यांना 5G सेवेचा आनंद घेता येईल. चला तर जाणून घेऊया ग्राहकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे...

प्रश्न : 5G म्हणजे काय?

उत्तर : 2G, 3G आणि 4G नंतर, 5G ही मोबाईल नेटवर्कची पाचवी पिढी आहे.

प्रश्न : 4G नेटवर्क संपेल का?
उत्तर :
नाही, 4G नेटवर्क अजून संपणार नाही. BSNL सारख्या काही सेवा प्रदात्या अजूनही त्यांच्या वापरकर्त्यांना 3G सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे देशातील काही भागात 4G नेटवर्कही कायम राहणार आहे. 5G नेटवर्क पूर्णपणे ताब्यात येईपर्यंत 4G ही सेवा सुरूच राहणार आहे.

प्रश्न : संपूर्ण देशात 5G कधी पोहोचेल?
उत्तर :
पंतप्रधान मोदींनी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये रविवारी 5G सेवा सुरू केली. याप्रसंगी एअरटेलने सांगितले की, कंपनी मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करेल. त्याचवेळी जिओच्या वतीने सांगण्यात आले की, डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात ते 5G सेवा वितरित करण्याची योजना आखली आहे.

आकाश अंबानी यांनी 5G सेवा लॉंच केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
आकाश अंबानी यांनी 5G सेवा लॉंच केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

प्रश्न : तुम्हाला नवीन सिम घ्यावे लागेल का?
उत्तर :
5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला नवीन सिम खरेदी करण्याची गरज नाही. 5G स्मार्टफोनच्या कार्ड स्लॉटमध्ये सिम टाकून, तुम्ही 5G सेवा वापरण्यास सक्षम असाल. जर तुमच्याकडे 3G किंवा 4G मोबाईल नसेल तर तुम्ही 5G सेवा वापरू शकणार नाही.

प्रश्न : मोबाईल लवकरच डिस्चार्ज होईल का?
उत्तर :
होय, तुम्ही 4G इंटरनेट सेवेच्या तुलनेत 5G सेवा वापरल्यास तुमचा मोबाईल लवकर डिस्चार्ज होईल. कारण फाईव्ह-जी चा स्पीड हा फोर जी पेक्षा जास्त असणार आहे.

प्रश्न : रिचार्ज करणे महाग होईल का?
उत्तर :
जिओ, एअरटेल किंवा कॅबिनेट मंत्रालयाकडून 5G रिचार्ज प्लॅनबाबत आतापर्यंत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, 5G प्लॅनची ​​किंमत 4G प्लॅन सारखीच असेल. तथापि, प्रीमियम वापरकर्त्यांसाठी काही दिवसांसाठी योजना महाग असू शकते.

बातम्या आणखी आहेत...