आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Domestic Air Fare Hike; Ministry Of Civil Aviation Increase Limit Of Minimum And Maximum Fare

हवाई प्रवास महागला:सरकारने किमान भाडे मर्यादा 10% आणि कमाल 13% ने वाढवली, विमानाचे नवीन भाडे वेळेनुसार केले निश्चित, असे असेल भाडे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांना आता जास्त भाडे भरावे लागणार आहे. नागरी उड्डान मंत्रालयाने आता किमान आणि कमाल भाड्याची मर्यादा वाढवली आहे. यामुळे विमान कंपन्या भाडे वाढवू शकतात. कमीत कमी भाडे 10% आणि जास्तीत जास्त 13% वाढणार आहे.

गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊननंतर, मे महिन्यात सरकारने विमान भाड्यांची मर्यादा निश्चित केली होती. कारण त्यावेळ कमी संख्येमध्ये विमान चालू होते. यामुळे कंपन्या तिकिटांसाठी जास्त पैसे आकारत होत्या. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे आणि विमान प्रवाशांची संख्याही वाढत आहे. यामुळे सरकारने ही मर्यादा वाढवली.

गुरुवारी रात्री काढले आदेश

सरकारने किमान भाडे 9.83%ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त भाडे 12.82%ने वाढवले ​​आहे. विमान मंत्रालयाने गुरुवारी रात्री उशिरा आदेश जारी करून ही माहिती दिली आहे. लोअर कॅप अर्थात सरकारने लावलेली किमान भाडे मर्यादा ही कंपन्यांना मदत करण्यासाठी होती. जास्तीत जास्त भाडे मर्यादेचा उद्देश प्रवाशांना मदत करणे हा होता.

40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2,900 रुपये मोजावे लागतील

मंत्रालयाच्या आदेशानुसार, 40 मिनिटांच्या प्रवासासाठी आता किमान भाडे 2,900 रुपये असेल. पूर्वी ते 2,600 रुपये होते. त्याच कालावधीसाठी जास्तीत जास्त भाडे आता 8,800 रुपये असेल. पूर्वी ते 7,700 रुपये होते. त्याचप्रमाणे 40-60 मिनिटांच्या उड्डाणासाठी किमान भाडे 3,700 रुपये असेल. पूर्वी ते 3,300 रुपये होते. जास्तीत जास्त भाडे 11,000 रुपये असेल. ते पूर्वी 9,500 रुपये होते.

दीड तासाच्या प्रवासासाठी 4,500 रुपये
दीड तासाच्या फ्लाइटचे किमान भाडे आता 4,500 रुपये असेल. त्यात 12.5%वाढ झाली आहे. त्याचे कमाल भाडे 13,200 रुपये असेल. त्यात 12.82%ने वाढ केली. त्याचप्रमाणे, दीड तासांपेक्षा जास्त म्हणजे 90-120 मिनिटांच्या फ्लाइटसाठी, किमान भाडे 4,700 रुपयांऐवजी 5,300 रुपये आणि 120-150 मिनिटांच्या फ्लाइटचे किमान भाडे 6,100 ऐवजी 6,700 रुपये असेल. 150 ते 180 मिनिटांच्या प्रवासासाठी किमान भाडे 7,400 ऐवजी 8,300 रुपये आणि 180 ते 210 मिनिटांच्या फ्लाइटसाठी 8,700 ऐवजी 9,800 रुपये असेल.

120-150 मिनिटांसाठी 6,700 रुपये द्यावे लागतील
120-150 मिनिटांच्या फ्लाइटचे किमान भाडे 6,700 रुपये निश्चित करण्यात आले आहे. या सर्व अंतराच्या उड्डाणांसाठी जास्तीत जास्त भाडे कमाल मर्यादा 12.3 वरून 12.39%करण्यात आली आहे. तसेच, या भाड्यात प्रवासी सुरक्षा शुल्क, विमानतळ वापरकर्ता विकास शुल्क आणि जीएसटी समाविष्ट नाही. म्हणजेच या मूलभूत भाड्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

ऑगस्टमध्ये वाढली प्रवाशांची संख्या

जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत 36% वाढ झाली आहे. वाढीचे मुख्य कारण आर्थिक इकोनॉमी अॅक्टिव्हिटी आणि कमी भाडे आहे. अनेक विमान कंपन्या कमी दरात आगाऊ तिकिटे बुक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...