आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Domestic Demand Alone Is Enough To Improve The State Of The Economy, The Worst Period Is Over; Opinion Of Niranjan Hiranandani, National President, Assocham, Nardeko

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:देशांतर्गत मागणीच अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी पुरेशी, सर्वात वाईट काळ संपला; असोचेम, नारडेकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांचे मत

कुलदीप सिंगोरिया | भोपाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व धोरणात्मक निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी वेगाने होणे गरजेचे

अर्थव्यवस्थेची घसरण जेवढी व्हायची होती तेवढी झाली आहे. आता तीत वाढ होईल. लॉकडाऊन आणि अनलॉकच पाहा. प्रत्येक अनलॉकमध्ये स्थितीत सुधारणा होत आहे. भारतात स्वत:ची देशांतर्गत मागणी मोठी आहे. ती अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुरेशी आहे. असोचेम ही उद्योग संघटना आणि नारडेको या रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोनामुळे चीनविरुद्ध जगात नकारात्मक भावनेची लाट आहे. त्यामुळे अनेक कारखाने चीनमधून बाहेर पडतील. तेथे अनेक कारखाने बंद झाले आहेतच. त्यापैकी बहुतांश व्हिएतनामला तर काही बांगलादेशमध्ये गेले. आता अशा कारखान्यांना आकर्षित करण्यासाठी ईझ ऑफ डुइंग आणखी चांगले करावे लागेल. धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीला वेग द्यावा लागेल.

या प्रश्नांचीही दिली उत्तरे

> कोरोनापासून उद्योगांनी कोणता धडा घेतला?

सर्वात मोठा धडा हा की, एका मिनिटात सर्व बदलू शकते. हे नेहमीच घडते. बदल हाच सर्वात स्थिर घटक आहे. आपण बदललेल्या या परिस्थितीशी जळवून घ्यायला हवे. म्हणजे कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीनुसार आपण आपल्या जीवनात आणि व्यवसायात बदल करायला हवा.

> रिअल इस्टेटवर कोरोनाचा काय परिणाम?

नवे बदल करणे अत्यंत गरजेचे आहेत. आता वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे लोकांना घर अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरात सर्वाधिक गुंतवणूक होईल. या क्षेत्रात या सर्व घटकांचा समावेश करावा लागेल. कोरोनाच्या हिशेबाने घरासाठी नवे मापदंड काय असतील, घरून सर्व कामे करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असेल, डिझाइन कसे असावे‌ हे पाहावे लागेल.

> रिअल इस्टेट क्षेत्रासमोरील आणखी आव्हाने कोणती आहेत?

रिअल इस्टेट क्षेत्रासाठी २०१९ हे वर्ष सकारात्मक राहिले होते आणि २०२० मध्ये वाढ होईल, अशी आमची अपेक्षा होती. पण लॉकडाऊनचा फटका बसला. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रोख रक्कम मिळेल याची तजवीज सरकारने करायला हवी. वन टाइम लोन रोलओव्हरसारखे कडक पाऊल गरजेचे आहे. रिअल इस्टेटशी २५० पेक्षा जास्त उद्योग जोडलेले आहेत हे सरकारने समजून घेणे गरजेचे आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser