आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Domestic Gas Price Hike By Rs 25, Cylinder Price Has Gone Up By Rs 125 So Far This Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढती महागाई:घरगुती गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ, या वर्षात आतापर्यंत 125 रुपयांनी महाग झाले सिलिंडर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी तेल कंपन्यांनी आज घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. यामुळे दिल्लीत विना सबसिडी १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर 819 रुपये झाला आहे. पूर्वी हा दर 794 रुपये होता. 2021 मध्ये गॅस सिलिंडर 125 रुपयांनी महाग झाला आहे. 1 जानेवारीला ही किंमत 694 रुपये होती, जी वाढून आता 819 रुपये झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात तीन वेळेस वाढले गॅसचे दर
फेब्रुवारी महिन्यात घरगुती LPG सिलिंडरचे दर 3 वेळेस वाढले. सरकारने 4 फेब्रुवारी रोजी गॅस दरात 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीला 50 रुपये आणि 25 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...