आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Domestic LPG Cylinder Goes Up By Rs 25, Unsubsidised Cylinder Costs Rs 884.50 In Delhi

महागाईचा फटका:घरगुती एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महाग झाला, दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 884.50 रुपये

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.50 रुपये झाले आहे. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

15 दिवसांत सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले
यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच 15 दिवसात विनाअनुदानित सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले आहे.

2021 मध्ये गॅस सिलिंडर 190.50 रुपयांनी महाग झाले
या वर्षी 1 जानेवारीला दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती. आता सिलिंडरची किंमत 884.5 रुपये आहे. म्हणजेच जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 190.50 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या 7 वर्षात गॅस सिलिंडरची किंमत दुप्पट झाली आहे
गेल्या 7 वर्षांत घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो) ची किंमत दुप्पट होऊन 884.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. 1 मार्च 2014 रोजी 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 410.5 रुपये होती, जी आता 884.50 रुपये आहे.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत
दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.

बातम्या आणखी आहेत...