आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी मे महिन्यात देशातील पाम तेलाची आयात ३३.२० टक्क्यांनी घसरून ५,१४,०२२ टन झाली आहे, परंतु रिफायनरीजद्वारे आरबीडी पामोलिन तेलाच्या शिपमेंटमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) या संस्थेने मंगळवारी सांगितले.
जगातील आघाडीची वनस्पती तेल खरेदीदार असलेल्या भारताने मे २०२१ मध्ये ७,६९,६०२ टन पाम तेलाची आयात केली. देशाची एकूण वनस्पती तेलाची आयात या वर्षी मे महिन्यात १०,०५,५४७ टन झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १२,१३,१४२ टन होती.
देशाच्या एकूण वनस्पती तेलाच्या आयातीमध्ये पाम तेलाचा वाटा सुमारे ५० टक्के आहे. एसईएनुसार, इंडोनेशियाने २३ मेपासून काही अटींसह पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे आणि निर्यात करदेखील कमी केला आहे. त्यामुळे इंडोनेशियामधून निर्यात वाढेल, जागतिक किमतींचा प्रभाव कमी होईल. एसईएच्या आकडेवारीनुसार पाम तेल उत्पादनांमध्ये क्रूड पाम तेलाची (सीपीआे) आयात या वर्षी मे महिन्यात ४.०९ लाख टनांवर घसरली, जी मागील वर्षी याच कालावधीत ७.५५ लाख टन होती. तथापि, आरबीडी पामोलिनची आयात २,०७५ टनांवरून १ लाख टनांवर झपाट्याने वाढली, क्रूड पाम कर्नल तेलाची (सीपीआेके) आयात ११,८९४ टनांवरून घटून ४,२६५ टन झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.