आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३२ वर्षीय सतीश पवार हे राज्य सरकारी कर्मचारी आहेत. २०२०पासून, ते ५ म्युच्युअल फंडांमध्ये दरमहा ५,०० रुपये गुंतवत आहे. २०२१ पासून, त्यात ४ फंडी आणि ५,००० रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अॅक्सिस ब्ल्यूचीप, डीएसपी फाेकस, इन्व्हेस्काे इंडिया स्माॅल कॅप, एबीएसएल फायनान्शियल अँड बँकिंग, पीजीआयएम मिड-कॅप अपॉर्च्युनिटी, एसबीआय निफ्टी इंडेक्स, निप्पॉन इंडिया फार्मा, एसबीअय गोल्ड, टाटा डिजिटल इंडिया फंड यांचा समावेश आहे. सतीश २०१४ पासून एनपीएस मध्ये दर महिन्याला ५,५०० रुपयांचे योगदान देत आहे. राज्य सरकारचेही तेच योगदान आहे. सतीशच्या मुलीचे शिक्षण व लग्नाव्यतिरिक्त, त्याला २०५० मध्ये सेवानिवृत्तीसाठी २०-२२ वर्षांत ५-६ कोटी रुपये जमा करायचे आहेत.
सतीश यांना आर्थिक सल्ला पुढील २२ वर्षांमध्ये ५ कोटींचा निधी जमा करण्यासाठी (जर १२% सीएजीआर परतावा अंदाजे असेल तर) प्रत्येक महिन्याला ४०,००० रुपयांची एसआयपी करावी लागेल. सतीश पवार यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये बहुतांश क्षेत्रीय किंवा थीमॅटिक फंडांचा समावेश आहे. सेक्टोरल किंवा थीमॅटिक फंडांमध्ये जास्त एक्सपोजर ठेवण्याचा सल्ला देत नाही. सतीशने प्रथम त्याच्या विद्यमान पोर्टफोलिओमध्ये लार्ज आणि मिड-कॅप, फ्लेक्सी-कॅप, मिड-कॅप व व्हॅल्यू श्रेणींचा समावेश करावा. सध्या आणि नंतर वाढलेल्या एसआयपीच्या माध्यमातून अॅक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज फंड, एचडीएफसी लार्ज अँड मिड-कॅप फंड, यूटीआय फ्लेक्सी-कॅप फंड, पीजीआयएम इंडिया मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड, निप्पॉन इंडिया मल्टी-कॅप फंड आणि एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंडात गुंतवणूक करावी. अशा प्रकारे त्यांचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण होईल.
आलोक अग्रवाल मुख्य संशाेधन अधिकारी बजाज कॅपिटल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.