आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईच्या एका कंपनीतील व्यवस्थापक दिनेश कपूर यांचे मासिक उत्पन्न १.५६ लाख रु. आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त ३,८०० रु.शिल्लक राहतात. आतापर्यंत त्यांनी ३.६ लाखाची बचत केली आहे. कपूर यांचा मुलगा १३ वर्षांचा आहे. मुलाला परदेशात शिकवण्यासाठी त्यांना ४-५ वर्षांनंतर ६० लाख लागतील.त्यांचा जीवन विमा ८ लाखाचा असून त्याची ५ वर्षांनी मुदत संपणार आहे. त्यामुळे ते त्यासाठी भविष्य निर्वाह निधीतून कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पीएफमध्ये ४५ लाख असून ते निवृत्तीनंतरच्या बचतीचे साधन आहे.
पोर्टफोलिओचे मूल्यांकन आणि सल्ला
कपूर यांनी दरमहा आणि जीवन विमा आणि निश्चित उत्पन्नातून ४६,७०० रुपयांची गुंतवणूक केली. दुसरीकडे, इक्विटीत केवळ ८ हजार रुपये महिन्याची गुंतवणूक करतात. इक्विटीत त्यांची गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार खूप कमी आहे. अश स्थितीत बँकिंग आणि पीएसयू फंडात २५,००० रुपयांची एसआयपी सुरू केली पाहिजे, ज्यात ७ टक्के परताव्याची अपेक्षा आहे. या हिशेबाने त्यांचा फंड पाच वर्षांत वाढून १८.५ लाख होईल. इक्विटी फंड वाढून ५.५ लाख रुपये होईल. यानंतरही त्यांच्याकडे १७ लाख रुपये कमी पडतील. अशा स्थितीत कपूर यांनी रेकरिंग डिपॉझिटचा पैसा वाढवून ५.५ लाख रुपये होईल. यानंतरही त्यांच्याकडे १७ लाख रुपयांची कमतरता असेल. त्यामुळे कपूर यांनी रिटायरमेंट फंडातून पैसा काढण्याऐवजी ही कमतरता पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेतले पाहिजे. कर्जावेळी मुलाला बारोअर केले पाहिजे. यामुळे कॉलेज संपल्यावर त्यालाही बचतीचे महत्त्व कळेल.
दिनेश कपूर यांचे वित्तीय उद्दिष्ट
कपूर यांना पीपीएफमध्ये गुंतवणुकीस 2,500 घटवून 10,000 ची एसआयपी एनपीएसमध्ये केली पहिजे. त्यांनी एनपीएसमध्ये अॅग्रेसिव्ह लाइफसायकल फंड घेतला पाहिजे. कपूरना इक्विटी फंडात 5,000 रुपयांची एसआयपी सुरू केली पाहिजे आणि दोन्ही एसआयपी दरवर्षी 5%वाढवली पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.