आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Dr. D. Y. Patil College Students Selection In Reputed Companies, Package From 6 Lacs To 45 Lacs

निवड:डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, 6 लाखांपासून ते 45 लाखांपर्यंत पॅकेज

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ साठी प्लेसमेंट प्रक्रिया आरंभ झाली असून इंजिनीरिंग, फार्मसी, एम.बी.ए, एम.सी.ए, अप्लाइड आर्टस् अँड क्राफ्ट्स आणि पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइप व ऑफलाइन मुलाखत होऊन अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एमिरिस लॅब्स, बायजूस, व्होडाफोन, आयडिया,व्हर्चुसा, व्हेरिटास, व्हॅल्यूलॅब्स, अशा विविध नामांकित कंपन्यांमध्ये मुलांची निवड होत असून वार्षिक वेतन ६ लाखांपासून ते ४५ लाखापर्यंत विद्यार्थ्यांना मिळाले. विपरीत परिस्थितीत ही विध्यार्थ्यांना २२ लाखाचे सर्वाधिक पॅकेज मिळाले. डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुल विविध महाविद्यालयातून मुले शिक्षण घेत आहेत. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष श्री. सतेज डी. पाटील, ट्रस्टी तेजस पाटील, कॅम्पस संचालक डॉ. नीरज व्यवहारे, प्राचार्य डॉ. सौ.पी.मालती आणि डॉ. सौ. ए.व्ही. पाटील, प्रोफ. अरविंद कोंडेकर, डॉ. सौ. के. निर्मला, डीन प्लेसमेंट्स- जस्मीता कौर यांचे मार्गदर्शन लाभले. या शैक्षणिक संकुलात उत्कृष्ट दर्जाच्या प्रयोग शाळा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...