आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंमली पदार्थ:बेलाड फाट्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यास वाहनासह अटक ; वाहनासह सात लाखांचा माल जप्त

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या एकास शहराच्या डीबी पथकाने वाहनासह अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ व दोन लाख रुपये किमतीची कार असा ७ लाखांचा माल जप्त केला. ही कारवाई ६ जून रोजी बेलाड फाट्यावर केली. येथील शहर ठाणेदार विजयसिंग राजपूत यांना एम.एच. १३/ एसी/ १६०७ या क्रमांकाच्या कारने अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. डीबी पथकाने बेलाड फाट़यावर सापळा रचला. काळी वेळानंतर बहापुरा गावाकडून बेलाड फाट्याकडे येणाऱ्या रस्त्यावरील कल्याण टोलचे ऑफिस परिसरात एक लाल रंगाची सँट्रो कार येताना दिसली. यावेळी पोलिसांनी एम. एच. १३/ ए.सी. /१६०७ या क्रमांकाचा कार चालक गोपाल आनंदकुमार जैस्वाल वय ४३ रा.पोस्ट रोड, कालीकुरती जालना जि.जालना येथील आरोपीकडून ५ लाख ६ हजार ८८० रुपये किमतीचा ४२ किलो अंमली पदार्थ व दोन लाख रुपये किमतीची कार असा ७ लाख ६ हजार ८८० रुपयाचा माल जप्त करून गोपाल जयस्वाल यास अटक केली. ही कारवाई डीबी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे, ईश्वर वाघ, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आसिफ शेख, अनिल डागोर व सलीम बरडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...