आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळेबंदी:हापूस व केशर 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त, दशेरी 25% महाग होऊ शकतो

अहमदाबाद, पुणे, लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्यातीतील घसरणीने आंब्याला खरेदीदार मिळत नाहीत, देशातच विक्री होतेय

बिजल नवलखा, मंगेश फल्ले 

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. परंतु यामुळे हापूस आणि केशरसारख्या महागड्या आंब्यांची चव अधिक लोकांना घेता येणार आहे. किमती ३० टक्क्यांपर्यंत घसरणे हे यामागील कारण आहे. निर्यातीत घट झाल्यामुळे ही घसरण झाली आहे. मात्र, हवामानाचा फटका बसलेला दशेरी हा प्रमुख आंबा घेण्यासाठी या वर्षी तुम्हाला कदाचित जास्त पैसे मोजावे लागू शकतात. निर्यातीत घट झाल्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये प्रतिडझन ७०० रुपये दराने विकला जाणारा हापूस आता ४०० ते ५०० रुपयांमध्ये विकला जात आहे. जर आगामी काळात घरगुती मागणी वाढली नाही तर दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. गुजरातमधील आंबा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केशर आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे व हळूहळू ते बाजारात येऊ लागले आहेत.येथील हवामानामुळे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. परंतु निर्यातीची कमकुवत स्थिती पाहता केशरच्या किमतीही यंदा २० ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

आंबा उत्पादनात आघाडीची ५ राज्ये

राज्य  उत्पादन

आंध्र प्रदेश  ५०.०२

यूपी  ४५.७७

बिहार २४.२५

कर्नाटक १८.६६

गुजरात १२.२५

उत्पादन लाख टनामध्ये

पॅकिंग व ग्रेडिंगसाठी मजूर मिळत नाहीत

कोरोना विषाणू महारोगराईमुळे या वर्षी निर्यात खडतर आहे. थोडाफार व्यवसाय होत आहे. त्यातही अडचण येत आहे. कारण पॅकिंग व ग्रेडिंगसाठी सध्या मजूर मिळत नाहीत. बटुकभाई, आशापुरा फार्म, कच्छ

बातम्या आणखी आहेत...