आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • During The Corona Period, 1000 New Hotels Opened In The World, Including The United States, With The Greatest Impact Of The Epidemic On The Field

संकटात नवी सुरुवात:कोरोना काळात अमेरिकेसह जगात उघडली 1000 नवी हॉटेल्स, महामारीचा सर्वाधिक परिणामदेखील याच क्षेत्रावर

सारा क्लेमेन्स | न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदाबादमध्ये 7 लक्झरी हॉटेल प्रकल्प सुरू, 2500 कोटींची गुंतवणूक

कोरोनामुळे जगात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. मार्चमध्ये संपूर्ण युरोपात हॉटेलमध्ये ऑक्युपेन्सीचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा खाली गेले होते. अमेरिकेत हॉटेल भाडे कमी केल्यानंतरही हा दर निम्म्यावर आला आहे. अशा स्थितीत हॉटेल क्षेत्र नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वाधिक घातक ठरू शकते, असे मानले जात आहे. मात्र यानंतरही अमेरिकेसह जगभरात १००० नवीन हॉटेल्स सुरू होत आहेत. तज्ञांच्या मते हा धक्कादायक ट्रेंड आहे.

हिल्टनने ६०, मॅरिएट ग्रुपने केले १६३ नवीन हॉटेल्सचे उद्घाटन

> जगभरात या वर्षी दुसऱ्या तिमाहीत नामांकित हॉटेल चेन हिल्टनने ६० नवी हॉटेल्स उघडली.

> मॅरिएटने चार रिट्झ कार्ल्टन हॉटेलसह एकूण १६३ हॉटेल प्रॉपर्टीचे उद्घाटन केले.

> नोबू हॉटेलने गत महिन्यात शिकागो, लंडन व्हर्सायमध्ये तीन नवी हॉटेल्स सुरू केली.

> अमेरिकेत २०२० च्या अखेरपर्यंत ७७५ नवीन हॉटेल्स सुरू होणार आहेत.

यामुळे उघडताहेत नवीन हॉटेल्स

> एक हॉटेल उभारण्यासाठी दोन ते पाच वर्षांचा वेळ लागतो. काम झाल्यानंतर ऑपरेशनमधील विलंब अडचणीचा ठरतो.

> लक्झरी हॉटेलमध्ये ५०% खर्च ऑक्युपेन्सीमधून भागतो, तर ऑक्युपेन्सी ७०% झाल्यास चांगली कमाई होते.

> बहुतांश हॉटेलजवळ १२ ते २४ महिन्यांपर्यंत पुरेल एवढी रोकड असते, यामुळे ते हॉटेल चालवू शकतात.

> कोरोनामुळे स्वच्छतेची मागणी लक्षात घेता लक्झरी हॉटेलकडे ग्राहकांचा कल वाढण्याची शक्यता आहे.

अहमदाबादमध्ये ७ लक्झरी हॉटेल प्रकल्प सुरू, २५०० कोटींची गुंतवणूक

अहमदाबाद| कोरोनानंतरही गुजरातमध्ये हॉटेल क्षेत्राची वाढ सुरू आहे. अहमदाबाद आणि त्याच्या आजूबाजूच्या ताज, मॅरिएट, आयटीसी, लीली शेरेटनसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे सात लक्झरी हॉटेलचे प्रकल्प सुरू झाले आहेत. यात पुढील एक ते दीड वर्षात सुमारे २५०० कोटींची गुंतवणूक होणे शक्य आहे.

कोविड-१९ नंतर आता स्थिती सुधारत आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पुढे चालून वाढ होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक होऊ शकते. गुजरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर हॉटेल उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. नरेंद्र सोमाणी, अध्यक्ष, गुजरात हॉटेल अँड रेस्तराँ असोसिएशन

बातम्या आणखी आहेत...