आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • During The Corona Period, Banks Felt More Personal Loans, Less MSMEs; News And Live Updates

अॅनालिसिस:कोरोना काळामध्ये बँकांनी वैयक्तिक कर्ज जास्त वाटले, एमएसएमईच्या वाट्याला कमी; वैयक्तिक कर्ज 5.5 लाख कोटी, एमएसएमईला केवळ 56,665 कोटी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या दोन वर्षांत बँकांनी एकूण 11.9 लाख कोटींचे नवीन कर्ज वाटलेमुंबई

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी सरकारने कर्जआधारित मदत पॅकेजचा विश्वास दिला. रिझर्व्ह बँकेनेही कर्ज वाटण्यातील सुलभतेसाठी बिगर पारंपरिक उपायांद्वारे बँकांना स्वस्त दर उपलब्ध केले. मात्र, बँक प्रभावित क्षेत्रांना कर्ज स्वरूपात पुरेसा पैसा वाटू शकली काय? आरबीआयच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास बँकांनी मे २०१९ पासून मे २०२१ दरम्यान एकूण ११.९ लाख कोटी रुपयांचे नवीन कर्ज नॉन फूड श्रेणीत वाटले. याचा एक मोठा हिस्सा वैयक्तिक कर्जदारांना कोलेटरल लोनच्या रूपात दिला.

मायक्रो इंटरप्रायजेस आणि निर्यातीसारखे आवश्यक उद्योग क्षेत्र कर्ज प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत आहेत. आकडेवारीनुसार, कर्ज वाटपासाठी वैयक्तिक कर्जदार बँकेची पहिली पसंती राहिली. गेल्या दाेन वर्षांत बँकांद्वारे वाटलेल्या नवीन कर्जाचा ४६% हिस्सा(५.५ लाख कोटी रु.) या श्रेणीत गेला. दुसरीकडे, बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या(एमएसएमई) उद्योगास केवळ ५६,६६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटले. गेल्या दोन वर्षांत एमएसएमईला वाटलेल्या कर्जाची रक्कम १४,६२७ कोटी रु. घटली. मध्यम आकाराचे उद्याेग कर्ज प्राप्त करण्यात पुढे राहिले. त्यांच्या कर्जाची रक्कम ७१,२९२ कोटी रु. वाढली.

एमएसएमईला कर्ज देणे बँकांसाठी प्राधान्य क्षेत्राअंतर्गत येते. याशिवाय एमएसएमईच्या अडचणी दूर करण्यासाठी गतवर्षी सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीमअंतर्गत(ईसीएलजीएस) या क्षेत्राला ४.५ लाख कोटींचे कर्ज उपलब्ध करण्याची घोषणा केली. मे २०२१ पर्यंत बँकांद्वारे वाटलेल्या नव्या १०७ लाख कोटींच्या कर्जात एमएसएमईच्या कर्जाची हिस्सेदारी १२.१ लाख कोटी रुपये आहे. मे २०१९ मध्ये ही ११.५ लाख कोटी रु. होती. एमएसएमईला दिलेल्या कर्जात वाढ झाली नसल्याचे यात दिसते.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला केवळ १०,५७८ कोटींचेच कर्ज मिळाले
दोन वर्षांत विविध बँकांकडून वाटलेल्या नव्या कर्जाचा एक चतुर्थांश हिस्सा म्हणजे सुमारे २.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज सेवा क्षेत्रातील उद्योगांना मिळाले आहे. मात्र, याचा मोठा हिस्सा घाऊक आणि किरकोळ ट्रेडमध्ये गेला. बँकांनी व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्राला ३३,००० कोटी रुपयांचे कर्ज वाटले. कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या हाॅस्पिटॅलिटी क्षेत्रास १०,५७८ कोटी रुपयांचेच कर्ज मिळू शकले. यामुळे क्षेत्रात ताण आहे.

बातम्या आणखी आहेत...