आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • During The Corona Period, Insurance Companies Made Term Insurance 37% More Expensive

भास्कर रिसर्च:कोरोना काळामध्ये विमा कंपन्यांनी ३७ टक्के महाग केला मुदत विमा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच कंपन्यांनी वाढवले दर, इतर कंपन्याही तयारीत

विमा कंपन्यांनी कोरोना कालावधीत जीवन विमा पॉलिसीचा सर्वाधिक विक्री उत्पादन टर्म इन्शुरन्स ३७ टक्क्यांपर्यंत महाग केला आहे. ज्या कंपन्यांनी अद्याप दर वाढवले ​​नाहीत त्यादेखील दर वाढवण्याची तयारी करत आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत टर्म इन्शुरन्सचा प्रीमियमही वाढवू शकतात. तथापि, विमा कंपन्यांनी ही वाढ कोरोनामुळे झाली नसल्याचे सांगितले आहे.

ऑनलाइन विमा कंपनी पॉलिसीबाजार डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार, खासगी विमा कंपन्यांमधील सातपैकी पाच कंपन्यांनी यावर्षी टर्म इन्शुरन्स महाग केला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या किमतींमध्ये सर्वाधिक ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने यावर्षी दोन वेळा प्रीमियममध्ये वाढ केली आहे. गेल्या वर्षी मार्चपर्यंत १४६९७ रुपयांमध्ये मिळणारा एक कोटीचा टर्म इन्शुरन्स आता २०२८० रुपयांमध्ये मिळत आहे. दरवाढीच्या बाबतीत बजाज अालियांझ लाइफ इन्शुरन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने टर्म इन्शुरन्स प्रीमियममध्ये ३६ टक्क्यांनी वाढ केली आहे. गतवर्षी कंपनी १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स ८९२७ रुपयांमध्ये देत होती. आता हे दर १२१३३ रुपये झाले आहेत. तथापि, या वाढीनंतरही बजाज अालियांझ लाइफ इन्शुरन्सचा टर्म इन्शुरन्स सर्वात स्वस्त विमा आहे. त्याच वेळी मॅक्स लाइफ इन्शुरन्सने आपल्या टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये केवळ ३% वाढ केली आहे. याशिवाय एचडीएफसी लाइफने प्रीमियममध्ये सुमारे २०% वाढ केली आहे, टाटा एआयएने प्रीमियममध्ये ३२% वाढ केली आहे.

पीएनबी मेटलाइफ इन्शुरन्स आणि कॅनरा एसएचबीसी ओबीसी लाइफ इन्शुरन्सने आतापर्यंत प्रीमियम वाढवला नाही. मात्र, लवकरच प्रीमियम वाढवण्यात येईल, असे दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.