आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनकार्ड गहाळ झाले मग चिंता नको:अवघ्या दोन मिनिटात मिळवता येईल ई-पॅन कार्ड; ते डाऊनलोड करण्याची प्रक्रिया घ्या जाणून

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परमनंट अकाउंट नंबर यालाच पॅन कार्ड असे संबोधले जाते. सद्यस्थितीत पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज म्हणून ओळखले जाते. सरकारी कामापासून ते खासगी ठिकाणी देखील पॅनकार्ड अनिवार्य झालेले आहे.

नवीन कर्ज काढायचे असेल, खात्यातून मोठी रक्कम काढायची असेल, बॅंकेत नवीन खाते उघडायचे असेल त्यासाठी तुम्हाला पॅन लागतेच. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल किंवा तुमच्या जवळचे पॅन कार्ड गहाळ झाले असेल तर अशा वेळी तुम्ही झटपट अगदी काही वेळात ई-पॅन काढू शकता.

ई-पॅन अवघ्या काही मिनिटांत काढू शकता
जर तुम्हाला आयटीआर रिटर्न भरायचे असेल पण पॅन कार्ड हरवले असेल, तर तुम्हाला ते काही मिनिटांत मिळू शकते. तुम्ही इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड किंवा ई-पॅन डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्ही जाणून घेऊ शकता ई-पॅन काढण्याची प्रक्रिया, आज अनेक वित्तीय संस्था फक्त ई-पॅन कार्ड स्वीकारतात. त्यासाठी हे खूप सोयीचे झाले आहेत.

ई पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम, ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आयकरच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर क्लिक करा.
  • यानंतर Instant E-Pan पॅनचा पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्ही नवीन ई पॅन पर्याय निवडा, येथे तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक विचारला जाईल, तेव्हा तुमचाा पॅन कार्ड क्रमांक टाका.
  • जर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक देखील टाकू शकता.
  • यानंतर तुम्हाला अनेक नियम आणि अटी दिल्या जातील, ते वाचा आणि नंतर Accept पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, हा OTP टाका.
  • त्यानंतर सर्व तपशील तपासा आणि नंतर सबमिट बटण दाबा.
  • पॅनची ही PDF तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुम्हाला पाठवली जाईल, तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता
बातम्या आणखी आहेत...