आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Economic Slowdown Has A Detrimental Impact On The Economy; 'The Epidemic Is The Dark Shadow Of The Future': Reserve Bank

इशारा:आर्थिक घडामाेडी सुस्तावल्याचा अर्थव्यवस्थेवर हाेताेय परिणाम; 'महामारी म्हणजे भविष्यावरची काळी सावली' : रिझर्व्ह बँक

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा हाेण्याच्या अंदाजांवर परिणाम हाेण्याची शक्यता

काेराेना व्हायरस म्हणजे अर्थव्यवस्थेच्या भवितव्यावरची एक प्रकारची काळी सावली अाहे. या महामारीमुळे जाहीर झालेला देशव्यापी लाॅकडाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणारा असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बंॅकेने गुरुवारी जाहीर केलेल्या अापल्या नाणेनिधी धाेरणात दिला अाहे. काेराेना महामारीमुळे जागतिक पातळीवरील उत्पादन, पुरवठा, व्यापार अाणि पर्यटनावर विपरित परिणाम हाेणार अाहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील संकुचत वाढीच्या अंदाजा माेठ्या  प्रमाणावर परिणाम हाेणार अाहे. देशभरात लागू करण्यात अालेला २१ दिवसांचा लाॅकडाऊन १७ व्या दिवसात प्रवेश केलेला असून अार्थिक घडामाेडी ठप्प झालेल्या असतानाच रिझर्व्ह बंॅकेचा हा अहवाल अालेला अाहे.

कोरोनोव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याच्या व्यक्त करण्यात अालेल्या अंदाजावर तीव्र परिणाम झाला आहे. कोरोनापूर्वी २०२०-२१  या वर्षातील वाढीचा अंदाज सामान्य होता पण या महामारीमुळे माेठा फटका बसला असल्याचे रिझर्व्ह बंॅकेने अापल्या अहवालात म्हटले अाहे.

  • मेअखेरपर्यंत जाहीर हाेणार २०१९-२० अखेरच्या तिमाहीची अाकडेवारी

लॉकडाऊनमुळे मंदावलेल्या अार्थिक घडामाेडींचा परिणाम हाेणे निश्चित

व्हायरसची गंभीरता अाणि त्याचा कालावधी याचा अाढावा घेण्यात येत अाहे. काेराेना व्हायरसमुळे लागू करण्यात अालेला लाॅकडाऊन अाणि जागतिक घडामाेडींमुळे अालेल्या मंदीचा देशाच्या विकास दरावर निश्चित परिणाम हाेणार अाहे.


२०१९-२० मध्ये जीडीपी विकास दरात  ५ % वाढ हाेण्याचा अंद
ाज 

रिझर्व्ह बंॅकेने २०१९-२० अार्थिक वर्षामध्ये जीडीपीमध्ये ५.० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज व्यक्त केला अाहे. विद्यमान अार्थिक वर्षात ५.५ टक्के वाढ हाेण्याचा अंदाज अाहे. २०१९-२० च्या शेवटच्या तिमाहीतील अधिकृत अाकडेवारी मे अखेरपर्यंत जाहीर हाेईल.

मार्चमध्ये महागाईचा दर चार महिन्यांच्या नीचांकीवर जाण्याचा अंदाज

फेब्रुवारीमध्ये ६.५८ टक्क्यांच्या तुलनेत देशातील किरकाेळ महागाईचा तर मार्चमध्ये ५.९३ % या चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहण्याची शक्यता अाहे. पुरवठ्यातील अडचणींमुळे खाद्य पदार्थांच्या किंमतीमध्ये घसरण हाेऊ शकते तर खाद्येतर पदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काेराेना व्हायरसमुळे जगभराल्या पुरवठा साखळीवर विपरित परिणाम हाेण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...