आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Economic Survey Explainer; Nirmala Sithararam | What Is? Who Will Present? Where Is Tabled?Chief Economic Adviser Krishnamurthy V Subramanian

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सप्लेनर:इकोनॉमिक सर्व्हे म्हणजे नेमके काय? सरकारला इकोनॉमिक सर्व्हे सादर करणे आणि शिफारस मान्य करणे बंधनकारक आहे का? येथे जाणून घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य आर्थिक सल्लागारांकडून बनवला जातो इकोनॉमिक सर्व्हे

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्ताऐवज सादर केला जातो त्याला इकोनॉमिक सर्व्हे (आर्थिक सर्व्हे) असे म्हटले जाते. ही तर झाली आर्थिक सर्व्हेची एका ओळीतील व्याख्या. पण, इकोनॉमिक सर्व्हे म्हणजे नेमके काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ...

भारत हा बहुतांशी मध्यमवर्गियांचा देश आहे. येथे अनेक घरांमध्ये महिनाभराच्या किंवा वार्षिक खर्चाची एक डायरी केली जाते. यामध्ये संपूर्ण हिशोब लिहिलेला असतो. वर्षाखेरीज आपण या डायरीत पाहून निष्कर्श काढतो की वर्ष कसा गेला. आपल्याकडे आलेला पैसा नेमका कुठे आणि कसा खर्च झाला. किती कमाई झाली आणि किती रुपये शिल्लक किंवा बचत झाली. यावरूनच आपण येणाऱ्या वर्षात खर्च कशा पद्धतीने करायचा, किती बचत करता येईल आणि आपले आर्थिक वर्ष कसे राहील या गोष्टींचा विचार करत असतो.

अगदी याच डायरीप्रमाणेच इकोनॉमिक सर्व्हेमध्ये सुद्धा याच गोष्टी नमूद केलेल्या असतात. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे. गतवर्षी झालेल्या खर्चाचा हिशोब, येणाऱ्या वर्षात असलेले काही सल्ले, आव्हान आणि त्यावर समाधान इत्यादी गोष्टींचा उल्लेख असतो. इकोनॉमिक सर्व्हे हा अर्थसंकल्प सादर होण्याच्या अदल्या दिवशी सादर केला जातो.

कोण बनवतो इकोनॉमिक सर्व्हे?
अर्थमंत्रालयाच्या अधिपत्याखाली एक इकोनॉमिक अफेअर्स नावाचे विभाग असते. त्याच्या अंतर्गत एक आणखी एक विभाग असते. हेच इकोनॉमिक डिव्हिजन मुख्य आर्थिक सल्लागार (चीफ इकोनॉमिक एडवाइजर CEA) यांच्या देखरेखीत आर्थिक इकोनॉमिक सर्व्हे तयार केला जातो.

सध्या डॉ. कृष्णमूर्ति सुब्रह्मण्यम मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. पहिले इकोनॉमिक सर्व्हे 1950-51 मध्ये सादर करण्यात आला होता. 1964 पर्यंत हा सर्व्हे अर्थसंकल्पासोबतच सादर केला जात होता. नंतर तो बजेटच्या एका दिवसापूर्वी सादर केला जाऊ लागला. सद्यस्थितीला हा सर्व्हे बजेट सादरीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी सादर होत आहे.

इकोनॉमिक सर्व्हे आवश्यक का?
इकोनॉमिक सर्व्हे आपल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम करत असते. यातूनच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येते. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी इकोनॉमिक सर्व्हेला खूप महत्व आहे.

इकोनॉमिक सर्व्हेतून अर्थव्यवस्थेत सुरू असलेले ताजे बदल पाहून सरकार त्यामध्ये सुधारणा सूचवत असते. मागच्या वर्षी सादर केलेल्या इकोनॉमिक सर्व्हेमध्ये सरकारने देशाला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा सल्ला दिला होता. तसेच पायाभूत विकासावर 1.4 ट्रिलियन डॉलर खर्च करण्याची गरज व्यक्त केली होती.

सरकारने इकोनॉमिक सर्व्हे सादर करणे बंधनकारक आहे का?
सरकारने इकोनॉमिक सर्व्हे सादर करावे किंवा त्यातील सल्ले पाळणे बंधनकारक नाही. सरकारला वाटल्यास यातील शिफारसी फेटाळून लावता येऊ शकतात. तरीही गेल्या वर्षीचा हिशोब यात असल्याने सर्व्हे अतिशय महत्वाचे आहे.

दोन भागांत येतो इकोनॉमिक सर्व्हे
सुरुवातीला इकोनॉमिक सर्व्हे एकाच भागात सादर केले जायचे. पण, 2014-15 पासून याचे सादरीकरण दोन विभागांत केले जात आहे. पहिल्या भागात अर्थव्यवस्थेसमोर असलेली आव्हाने यावर लक्ष दिले जाते. दुसऱ्या भागात अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांचा सर्व्हे केलेला असतो. या व्यतिरिक्त आकडेवारी सुद्धा जारी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...