आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या कामगार विभागाने बेरोजगारीचे आकडे जाहीर केले. एकीकडे रेस्तराँ व दुकानांत कामाला लोक भेटत नाही तर ९८ लाख अजूनही बेरोजगार आहेत. अमेरिकी संस्था सीआयएचे पहिले आर्थिक गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ व ‘द न्यू ग्रेट डिप्रेशन’चे लेखक जिम रिकर्ड््स सांगतात की, ही स्थिती जगाच्या खऱ्या अर्थव्यवस्थेचे चित्र दाखवते. जग मंदीत असून सर्वसामान्यांना आर्थिक तंगीपासून वाचायचे असेल तर सोने, रोकड, बाँडचा आधार घ्यावा लागेल. दैनिक भास्करचे रितेश शुक्ल यांनी त्यांच्याशी बातचीत केली. वाचा मुख्य अंश...
सर्व अर्थतज्ञ जलद रिकव्हरीचे सांगताहेत, तर तुम्ही कोणत्या आधारावर औदासीन्याची भविष्यवाणी व्यक्त करत आहात?
अर्थतज्ञ चुकीचे आहेत. जागतिक महामारीचा आर्थिक प्रभाव तीन दशके राहतो असे इतिहास सांगतो. सध्या लोक पैसे खर्च करणे टाळत आहेत. यामुळे आज अमेरिकेत बचतीचे प्रमाण १५% आहे. गेल्या दहा वर्षांची सरासरी ५-८% च आहे. जगभरातील सरकारे मोठ्या कर्जात आहेत. अमेरिकी सरकारचे कर्ज जीडीपीच्या तुलनेत १३०% झाले आहे. भारतासह अनेक मोठ्या देशांचा आकडा ९०% वर येत आहे. ६०% लक्ष्मण रेषा आहे. जगात ८०% आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतो. डॉलर राखीव मुद्रा असलेल्या देशांना अवघड जाईल. डॉलरची किंमत घटल्यास या देशांसाठी आयात महाग होईल. म्हणजे मंदी.
कोणते देश या मंदीतून सहज बाहेर येतील?
वयस्कर होणाऱ्या लोकसंख्येमुळे लॅटिन अमेरिका, युरोप, जपान व चीनसाठी परिस्थिती बिकट होईल. जगाला मंदीतून बाहेर येण्यासाठी भारताची मदत होईल. कारण, वाढत्या लोकसंख्येमुळे येथील आर्थिक विकास इतरांच्या तुलनेत जलद होईल. दुसरे, येथील लोकांना सोन्याची हौस आहे, ती मंदीत फायदेशीर ठरेल.
सोन्यात असे काय विशेष आहे?
डॉलरचे मूल्य घटल्यास सोन्याचे वाढते. १९७१ मध्ये सोने चलनातून मुक्त झाल्याने १९८० पर्यंत सोन्याच्या किमती २०००% वाढल्या. हे सोन्याचे पहिले बुल मार्केट होते. १९९९ ते २०११ पर्यंत चाललेल्या दुसऱ्या बुल मार्केटमध्ये सोन्याच्या किमती ६७०% वाढल्या. दोन्ही वेळा सोने सरासरी १५ पट वाढले. तिसरे बुल मार्केट २०१५ मध्ये सुरू झाले आहे. २०२५ पर्यंत सोने दहापट तरी वधारेल.
या मंदीचा अंदाज येणे कधी सुरू झाले?
शेअर कोसळू लागले आणि सोने वधारू लागले तेव्हा मंदीचा अंदाज येऊ लागला. लॉकडाऊननंतर मागणीच्या तुलनेत पुरवठा होणार नाही तेव्हा रोज लागणाऱ्या सामानाची महागाई होईल. २०२२ येईपर्यंत ही स्थिती निर्माण झालेली असेल.
सोने वधारण्यामागे आणखी ठोस कारण आहे का?
नक्कीच आहे. जगभरात एकूण ३४ हजार मेट्रिक टन सोने आहे. जर जगभरातील ७५% जीडीपी असलेल्या देशांचे एकूण चलन एकत्र केले आणि ३४ हजार मेट्रिक टनने भागाकार घेतला तर सहजपणे एक तोळा सोन्याचा दर सध्याच्या १७७० डॉलर तोळ्यावरून १५ ते २० हजार डॉलर होईल. अडचणीच्या काळात अमेरिकेकडे मर्यादित उपाय आहेत. ते दिवाळखोर जाहीर होतील, मात्र ते होणार नाहीत. यामुळे ते जास्त व्याजदराने कर्ज घेतील याचाच अर्थ डॉलरचे मूल्य घटेल. यामुळे अमेरिकी डॉलर आणि युरोच्या तुलनेत सोने वधारेल. २०२५ पर्यंत डॉलरचे मूल्य १०-१५ पट घटेल आणि त्याच दराने सोने वधारेल.
नक्कीच आहे. जगभरात एकूण ३४ हजार मेट्रिक टन सोने आहे. जर जगभरातील ७५% जीडीपी असलेल्या देशांचे एकूण चलन एकत्र केले आणि ३४ हजार मेट्रिक टनने भागाकार घेतला तर सहजपणे एक तोळा सोन्याचा दर सध्याच्या १७७० डॉलर तोळ्यावरून १५ ते २० हजार डॉलर होईल. अडचणीच्या काळात अमेरिकेकडे मर्यादित उपाय आहेत. ते दिवाळखोर जाहीर होतील, मात्र ते होणार नाहीत. यामुळे ते जास्त व्याजदराने कर्ज घेतील याचाच अर्थ डॉलरचे मूल्य घटेल. यामुळे अमेरिकी डॉलर आणि युरोच्या तुलनेत सोने वधारेल. २०२५ पर्यंत डॉलरचे मूल्य १०-१५ पट घटेल अाणि त्याच दराने सोने वधारेल.
मग काय प्रत्येकाने सोने विकत घ्यायला हवे?
हो आणि विकत घेऊन आपल्याकडे ठेवायला हवे. जर सरकार कमकुवत सिद्ध झाले तर ते लोकांचे सोने अधिग्रहित करू शकते. जर लोकांचा आपल्या सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी सोने लॉकरमध्ये न ठेवता आपल्याकडे ठेवायला हवे म्हणजे त्याचा वापर कधीही करता येईल. जर सरकार समजदार असेल तर ते लोकांनाही सोने ठेवू देईल आणि स्वत:ही त्याचा साठा करेल. भारतातील सरकार लोकांकडून सोने हिसकावण्याची चूक करणार नाही. कारण अशी सरकारे कोसळतील.
बिटकॉइनबद्दल तुमचे मत काय?
ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढू शकतो. डिजिटल चलनाच्या नावाने केंद्रीय बँक क्रिप्टोकरन्सी आणण्याची शक्यता आहे. यामुळे व्यावसायिक बँका धोक्यात येतील. कारण त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बिटकाॅइन एक जुगार आहे यापेक्षा दुसरे नाही. काही जुगार दीर्घकाळ चालतात.
अमेरिकेत बेरोजगारी सहज कमी होणार नाही?
कोरोना काळात एकट्या अमेरिकेत ७ कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र १०% लोकदेखील नोकरीवर परतलेले नाहीत. येथे सरकार लोकांना वर्षाचे ५० हजार डॉलरची मदत देत आहे, तर त्यांचे सरासरी उत्पन्न २८ हजार डॉलर होते. यामुळे अनेक जण नोकरीचा शोध घेत नाहीत. त्यांचाही समावेश केल्यास अमेरिकेत बेरोजगारी ११% च्या वर होईल, जी ६.१% सांगितली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.