आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Economy Years 2021 22: The Economy Recovers Gdp Grow With 10.1%; World Fifth Lagest Economy In 2024 News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक वर्ष 2021-22:​​​​​​​अर्थव्यवस्थेची पुन्हा मुसंडी, जीडीपी यंदा 10.1 टक्के राहण्याची अपेक्षा; महामारीच्या संकटानंतरही भारतात प्रचंड संधी, 2024 पर्यंत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर

वॉशिंग्टन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताची जीडीपी वाढ दुप्पट होण्याचा जागतिक बँकेचा अंदाज; हिंदुजा म्हणाले- आर्थिक संकेत खूप उत्साहवर्धक अशोक पी. हिंदुजा, चेअरमन, हिंदुजा ग्रुप

कोरोना काळात वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. त्यामुळे बँकेने भारताबाबतच्या अंदाजात सुधारणा केली आहे. बँकेने बुधवारच्या अहवालात म्हटले आहे की, खासगी खप आणि गुंतवणूक वाढल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी वाढ १०.१% राहू शकते. ती जानेवारीत वर्तवलेल्या ५.४% वाढीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. तथापि, २०२१-२२ ची अनिश्चितता पाहता जागतिक बँकेने ७.५% ते १२.५% ची सीमाही सांगितली आहे. २२ मार्चलाच फिच या रेटिंग संस्थेने २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत १२.८%ची मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. जागतिक बँकेने साऊथ एशिया इकॉनाॅमिक फोकस रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, दक्षिण आशियात भारत सर्वात मोठा देश आहे. २०२० मध्ये फक्त भारतात एफडीआय वाढली आहे. भारत आयटी कन्सल्टिंग आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, डेटा प्रोसेसिंग सर्व्हिस आणि डिजिटल पेमेंटसह डिजिटल क्षेत्रात विक्रमी संख्येने करार आकर्षित करत आहे. बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ हॅन्स टिमर यांच्या मते, भारताने पुन्हा मुसंडी मारली आहे. अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. लसीकरण सुरू झाले असून भारत लस उत्पादनात अग्रणी आहे. तथापि, कोरोना महामारीमुळे स्थिती अजूनही आव्हानात्मक आहे.

भारत पुन्हा रिकव्हर होण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, हे अलीकडेच समोर आलेला डेटा सांगतो. सर्वकाही चांगले राहिले तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात आपला वृद्धिदर दुहेरी आकड्यात राहील, अशी अपेक्षा आहे. विविध आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनीही त्याला दुजोरा दिला आहे. जागतिक महामारीच्या काळातही संसर्ग आणि मृत्यूचा कमी दर आणि व्यापक लसीकरण कार्यक्रमामुळे निश्चितपणे ग्राहक आणि व्यवसाय या दोघांचाही आत्मविश्वास वाढेल, अशी अपेक्षा आहे. कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, पण आता सध्याचे आर्थिक संकेत खूपच उत्साहवर्धक आहेत. खप, गुंतवणूक आणि निर्यात वाढल्याने आगामी काही वर्षांत विकासाला प्रोत्साहन मिळेल. भारताकडे इंजिनिअर आणि आयटी टेक्नॉलॉजिस्ट यांचे टॅलेंट पूल आहे. तंत्रज्ञान अनेक अडथळ्यांवर कसे मात करते हे लॉकडाऊनने आपल्याला शिकवले आहे. त्यामुळे भारतीय युवक आयटीशी संबंधित व्यवसाय, स्टार्टअप या क्षेत्रात प्रगती करत असल्याचे दिसेल. खासगी गुंतवणूकही वाढू शकते. सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या सुधारणा आणि रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे आलेल्या उसळीमुळे आर्थिक रिकव्हरीत आणखी वाढ होऊ शकते. तरीही रिकव्हरीच्या मार्गात काही आव्हाने असू शकतात. भारताच्या बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातही मजबूत वाढ दिसेल. फक्त २०२१-२२ हे आर्थिक वर्षच नव्हे तर आगामी काही वर्षे भारताचीच असतील. भारत २०२४ पर्यंत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. ३.७ लाख कोटी रुपयांच्या जीडीपीसह भारत फ्रान्स आणि ब्रिटन या दोघांना मागे टाकेल.

या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेणे हे आपल्यावरच अवलंबून
जागतिक महामारीच्या संकटानंतरही भारतात अनेक संधी आहेत. या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेणे हे आपण भारतीय आणि आपल्या धोरण निर्मात्यांवर अवलंबून आहे. महामारीनंतर जग आधीसारखे असणार नाही. आता बिझनेस न्यू नॉर्मलच्या आधारावर चालणार आहे, त्यामुळे आपणा सर्वांना विकसित होण्याची, अनुकूल होण्याची गरज आहे तसेच आपल्या कौशल्यात आणखी वाढ करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...