आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • ED Arrested In Money Laundering Case, Accused Of Involvement In Co Location Scam And Phone Tapping

NSE चे माजी प्रमुख रवी नारायण यांना ED कडून अटक:को-लोकेशन स्कॅम आणि फोन टॅपिंग प्रकरणात हात असल्याचा आरोप

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी सीईओ आणि एमडी रवी नारायण यांना अटक केली आहे. नारायण यांच्यावर को-लोकेशन घोटाळा आणि कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंगशी संबंध असल्याचा आरोप आहे.

2017 मध्ये दिला राजीनामा

नारायण एप्रिल 1994 ते 31 मार्च 2013 पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर 1 एप्रिलपासून नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE)बोर्डावर गैर-कार्यकारी श्रेणीमध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 1 जून 2017 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

चित्रा रामकृष्ण यांनाही अटक

नारायण यांच्या आधी ईडीने NSE च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना देखील अटक केली आहे. सीबीआय देखील या प्रकरणी सखोल तपास करत आहे. लोकेशन घोटाळा प्रकरणी चित्रा यांना सीबीआयने अटक केली आहे.

आयुक्त पांडे यांनाही अटक

फोन टॅपिंग घोटाळा प्रकरणी ईडीने मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देखील अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पांडे यांच्या एका कंपनीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

2009 आणि 2017 मध्ये फोन टॅपिंग

ईडीने जुलैमध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या माजी प्रमुखांविरोधात अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) दाखल केला आहे. त्यांच्या मते 2009 आणि 2017 मध्ये फोन टॅपिंग करण्यात आली होती.

काय आहे को-लोकेशन स्कॅम?

एनएसई को-लोकेशन प्रकरणातील एफआयआर 2018 मध्ये नोंदवण्यात आला होता. किंबहुना, देशातील प्रमुख नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील काही ब्रोकर्स, जे शेअर्सची खरेदी-विक्री करतात, त्यांना अशी सुविधा देण्यात आली होती, जेणेकरून त्यांना शेअर्सच्या किमतींची माहिती इतरांपेक्षा लवकर मिळेल.

याचा फायदा घेऊन ते प्रचंड नफा कमवत होते. काही ब्रोकर्सना सर्व्हर को-लोकेशन करून थेट प्रवेश देण्यात आला. सेबीला याबाबत अधिसूचना मिळाली होती. एनएसई अधिकाऱ्यांच्या मदतीने काही दलाल आधीच उपलब्ध असलेल्या माहितीचा गैरवापर करत असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...