आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा मिळण्याची शक्यता:​​​​​​​खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर 3 ते 5 रुपयांनी होऊ शकते कपात, उद्योग संघटनांनी केली मागणी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर 3 ते 5 रुपयांनी कमी होऊ शकतात. कारण सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) या उद्योग संस्थेने आपल्या सदस्यांना अशी मागणी केली आहे.

SEA ने केले आवाहन
SEA ने सोमवारी आपल्या सदस्यांना खाद्यतेलाच्या किमती तातडीने कमी करण्यास सांगितले. ही कपात किरकोळ किंमतीत करण्यात येणार आहे. मात्र, जागतिक पातळीवरील घडामोडी पाहता खाद्यतेलाच्या किमतीत फारशी घसरण अपेक्षित नाही, असेही संघटनेने म्हटले आहे.

दुसऱ्यांदा कपातीची मागणी
SEA ने आपल्या सदस्यांना कमाल किरकोळ किमतीत कपात करण्याचे आवाहन करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वेळी, नोव्हेंबर 2021 मध्ये दिवाळीच्या आसपास किंमती 3 ते 5 रुपयांनी कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी हे केले. भारत आपल्या खाद्यतेलाची 60% पेक्षा जास्त मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो.

पामतेलावरील आयात शुल्क कमी
गेल्या काही महिन्यांत, भारताने खाद्यतेलाच्या किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाम तेलावरील आयात शुल्क कमी करणे, स्टॉक सीमा लागू करणे इत्यादी विविध पावले उचलली आहेत. सरकारच्या या सक्रिय प्रयत्नांनंतरही, सरासरी किरकोळ किमती वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत अजूनही जास्त आहेत.

किंमती कमी होण्याची कोणतीही त्वरित चिन्हे नाहीत
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, या किमती तात्काळ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इंडोनेशियासारख्या काही निर्यातदार देशांनीही लायसेन्सच्या माध्यमातून पामतेल निर्यातीला रेग्युलेट करणे सुरु केले आहे.

खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले
जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव त्या प्रदेशातून येणाऱ्या सूर्यफूल तेलासाठी आगीत तेल ओतत आहे. ला नीनामुळे ब्राझीलमधील खराब हवामानाने देखील लॅटिन अमेरिकेतील सोया पिकांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. ही जागतिक परिस्थिती लक्षात घेता, SEA ने म्हटले आहे की, तरीही त्यांचे सदस्य खाद्यतेलाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

मोहरीचे पीक चांगले आहे
देशांतर्गत मोहरीचे पीक अधिक चांगले असल्याचे SEA ने सांगितले. चालू वर्षात विक्रमी पीक अपेक्षित आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. याशिवाय, नवीन मोहरीचे पीक बाजारात येण्यापूर्वी किमती कमी करण्यासाठी सरकार तातडीने पावले उचलत आहे. कच्च्या पामतेलावरील आयात शुल्कात अलीकडची 2.5% कपात हे त्याचे उदाहरण आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी शेंगदाणा तेलाची सरासरी किरकोळ किंमत 177.75 रुपये प्रति किलो होती, जी एका वर्षापूर्वी 164.55 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त होती. त्याचप्रमाणे, मोहरीच्या तेलाची किरकोळ किंमत 2021 मध्ये याच वेळी 145.02 रुपये प्रति किलोच्या तुलनेत यावर्षी 20 फेब्रुवारी रोजी 187.03 रुपये प्रति किलो होती. सूर्यफूल तेलाची किरकोळ किंमत 144.22 रुपये प्रति किलोवरून 161.75 रुपये प्रति किलो झाली आहे, तर पाम तेलाची किंमत 113.89 रुपयांवरून 130.53 रुपये झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...