आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Edible Oil Prices Updates: To Rise Sharply In International Markets Of Oil Prices; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंदाज:आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीने खाद्यतेलाच्या किमती वाढणार!; जास्त वापराच्या तुलनेत कमकुवत पुरवठ्याचा परिणाम दिसणार

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार, 2021 पाम तेलाचा भाग 975 डॉलर/टनापर्यंत जाईल

खाद्यतेलाच्या किमती गेल्या एका वर्षात विविध अन्य कृषी जिनसांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढत आहेत आणि नजीकच्या भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता नाही. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, २०२२ आधी किमती घटणे आणि स्थिर होण्याचा परिणाम कमी आहे. कमी उत्पादन आणि इन्व्हेंटरीमुळे पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या किमतीत सलग १० महिन्यांपर्यंत खाद्यतेल उद्योगातील तज्ज्ञांना अपेक्षा होती की, मार्चपर्यंत किमती घटू लागतील. या महिन्यात पाम व सोयाबीन तेलाचे उत्पादन विक्रमी स्थितीत असते हे त्याचे कारण आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातही पाम, सोया तेलाच्या किमतीत घट होण्याचे संकेत नाहीत. जागतिक बँकेनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती यंदा वेगाने वाढतील. अपेक्षेपेक्षा जास्त वापराच्या तुलनेत कमकुवत पुरवठ्यामुळे २०२२ आधी ग्लोबल व्हिजिटेबल ऑइल मार्केटमध्ये स्थैर्य येण्याची अाशा नाही.

देशातील उत्पादन वाढीचा कमी फरक
देशातील बाजारात खाद्यतेलाच्या भावातील कल आंतरराष्ट्रीय बाजारानुसार राहील. देशातील उत्पादन वाढल्यानंतरही ६५% आयात होईल.आंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशातील बाजारातही तेजी राहील. - डी.एन. पाठक, ईडी, सापा

महारोगराई वाढल्यावर साठेबाजी वाढते
देशात मोहरीचे मोठे उत्पादन होऊनही भाव ७,१०० रु.प्रति क्विंटलवर आहे. महारोगराई वाढल्यावर साठेबाजी वाढते. अशा स्थितीत भाव घटण्याचा परिणाम कमी आहे. - अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायजरी

देशात जूनपासून घटू लागतील किमती
जूनपासून खाद्यतेलाच्या किमती घटतील. देशातील बाजारात तेलबियांचे विशेषत: मोहरीचे क्षेत्र वाढले आहे, हे त्यामागचे कारण आहे. जागतिक बाजारात पाम तेल “हाय प्रोडक्शन सायकल’मध्ये प्रवेश करत आहे. - बी.व्ही. मेहता, ईडी, एसईए

भारताला करावी लागेल ६५% खाद्यतेलाची आयात
भारताने फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ३३.५% जास्त ५,२६,४६३ टन सीपीओची आयात केली आहे. या वर्षी खाद्यतेलाचे देशातील उत्पादन वाढल्यानंतरही भारताला सुमारे ६५ टक्के आयात करावी लागेल.

  • खाद्यतेलाचा एकूण वापर : २३० लाख टन
  • एकूण स्थानिक उत्पादन : ७०-८० लाख टन
  • खाद्यतेलाची किमान घट : १५० लाख टन
  • 34 लाख टन वाढले होते जगातील आठ खाद्यतेलांच्या उत्पादन २०१९-२० मध्ये
  • 29 लाख टन उत्पादन आठ खाद्यतेलांचे होण्याची शक्यता २०२०-२१ आहे
बातम्या आणखी आहेत...