आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Effect Of Unlock 1 | Cheap Home Loans, Development Offers, Rapid Construction Improvements In NRI Demand

सुधारणा:स्वस्त गृह कर्ज, विकासाच्या ऑफर्स, एनआरआय मागणीतील तेजीने बांधकाम क्षेत्रात सुधारणा

नवी दिल्ली/भाेपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनलॉकचा परिणाम दिसू लागला, कोरोनाआधीच्या स्थितीत परतत आहे रिअॅल्टी क्षेत्र

काेराेना विषाणू महामारीमुळे अनेक क्षेत्राप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्रही प्रभाावित झाले हाेते. एप्रिल-मेमध्ये विक्रीतील तेज घसरण पाहता आणि सेक्टर काेराेना काळात आधीच्या स्थितीत परतत आहे. विकासकांकडून घरांवर दिल्या जाणाऱ्या ५ ते १२ टक्क्यांपर्यंतच्या सवलतीमुळे देशातील खरेदीदारांची आवड वाढणे आणि एनआरआय खरेदीदारांकडून पुन्हा मागणी वाढल्यामुळे हा बदल दिसत असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे, कोरोना काळाआधी बहुतांश बुकिंग रद्द न झाल्यानेही विकासक दिलासादायक अनुभव घेत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या विश्लेषणानुसार निवासी क्षेत्रात या वर्षी २०२० च्या पहिल्या सहामाहीत विक्री ५१ टक्के कमी राहिली. वार्षिक आधारावर नव्या लाँचिंगमध्ये २४ टक्के घट आली आहे. कामगार आणि तरलतेच्या संकटामुळे लाँचिंगही लांबली आहे. सुरक्षा, आरोग्य आणि वेलनेस चिंता पाहता खरेदीच्या निर्णयात काहीसा विलंब होऊ शकतो. असे असले तरी, अशा सर्व स्थितीत फंडामेंटल बळकट राहील. विकासक आपली कामे कमी करण्यात गुंतले आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया(क्रेडाई)चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी सांगितले की, अनलॉक-१ नंतर रिअल इस्टेटमध्ये सुधारणा सुरू झाली आहे. यापुढच्या काळात यात आणखी तेजी येईल. त्यांनी सांगितले की, जसजशी मागणी येत राहील, कामेही वेगाने करण्याचा प्रयत्न राहील. मात्र, मजुरांची घट पाहता सध्या मोठी समस्या दिसत आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे बांधकामाचा वेग मंद पडत आहे. कोरोना काळात मिळालेला धडाच बिल्डर अंगीकारत आहेत. ते आता घरांत बदल करत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, बहुतांश विकासक सदनिकाचा आकार ग्राहकाच्या मागणीनुसार करत आहेत. नवी परिस्थिती पाहता झालेल्या नव्या लाँचिंगमध्ये जास्त आऊटडोअर स्पेस, स्टडी रूम, चांगले ब्रॉडबँड आदींची काळजी घेतली जात आहे. याशिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लक्झरी अपार्टमेंटवर १०-१२ टक्के सुटीची ऑफर दिली जात आहे. अहवालात नमूद केले की, रिअल इस्टेटसाठी चांगले संकेतही आहेत, कारण कोरोना संकट असतानाही मागणीत वाढ झाली आहे. लॉकडाऊन पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर मागणी आधीच्या पातळीवर येण्याची आशा आहे.

ई-कॉमर्स- वेअर हाउसिंगच्या सुधारणेत वाढ: 

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या अवधीत ऑनलाइन खर्च वाढल्याने वेअर हाउसिंगशी संबंधित रिअल इस्टेटमध्ये बळकटी आली आहे. याशिवाय, मॉल्सची स्थितीही सुधारण्याची आशा आहे. चीनमध्ये मॉलमध्ये होणारी विक्री कोरोना आधीच्या ६० % स्तरापर्यंत पोहोचली आहे. आगामी काळात भारतातही सुधारणा नोंदली जाऊ शकते.

लॉकडाऊनमध्ये भाडेकरूंना झालेला त्रास, वर्क फ्रॉम होममुळे खरेदीस प्ररेणा

एचडीएफसी सिक्युरिटीजने जेएलएल क्लाइंट सर्व्हेचा हवाला देत सांगितले की, कोरोना काळानंतरही ५ ते २२ टक्के कर्मचारी आता कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होऊ करू शकतात. जाणकारांनुसार, यामुळे ऑफिस स्पेसची मागणी कमी होऊ शकते. मात्र, यामुळे घरांची मागणी वाढू शकते. खासगी विकासांची दुसरी मोठी संघटना नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काैन्सिल म्हणजे नारडेकोचे व्हाइस चेअरमन प्रवीण जैन याला सहमती दर्शवत सांगतात की लॉकडाऊनमध्ये भाडेकरूंना त्रास सहन करावा लागला. यामुळेही लोेकांना स्वत:चे घर असावे वाटते. वर्क फ्रॉम होममुळे लोक घर खरेदी करण्यात घाई करत आहेत.

0