आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाद्य तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसापासून सतत वाढ आहे. परंतु, केंद्र सरकारने क्रूड आणि रिफाइंड पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलाच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने तेलांच्या आयात शुल्कामध्ये कपात केला आहे. यामुळे जर ग्राहकाला कर कपातीचा पूर्ण लाभ मिळाला तर तेलांच्या किमतीत 4 ते 5 रुपये प्रति किलोने घट होऊ शकते.
सणापूर्वी गगणाला भिडणाऱ्या तेलांच्या किंमती करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी याची शक्यता वर्तवली होती. स्वयंपाकाच्या तेलाची होर्डिंगवर बंदी आणण्यासाठी राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.
तेलांच्या किंमतीत 5 रुपयांनी होऊ शकते घट
सरकारने तेलांच्या आयातवरील शुल्कात कपात केला आहे. यामुळे जर याचा पूर्ण फायदा ग्राहकाला मिळाला तर खाद्य तेलांच्या किंमतीत 4-5 रुपयांनी घट होऊ शकते. असे खाद्य तेल उद्योग संस्था सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (SEA) कार्यकारी संचालक डॉ बी व्ही मेहता यांनी सांगितले आहे. जर व्यापाऱ्यांनी कर दरातील कपातीचा काही भाग त्यांच्याकडे ठेवला तर ग्राहकाला कमीतकमी 2 ते 3 रुपये प्रति किलो कपातीचा लाभ मिळू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.
क्रूड सोया तेलाची घाऊक किंमतीत प्रति टन 4991.20 रुपयांनी घट होण्याची शक्यता
मेहता यांच्या मते, सध्याचे दर आणि परकीय चलनाच्या विनिमय दरानुसार कच्च्या सोया तेलाची किंमतीत प्रति टन 67.54 डॉलर (4991.20 रुपये) घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, कच्च्या पाम तेलाची किंमत $ 56.59 म्हणजेच प्रति टन 4182.18 रुपयांनी कमी होऊ शकते. रिफाइंड पाम तेल 58.52 डॉलर म्हणजेच 4334.62 रुपये प्रति टन स्वस्त होऊ शकते असे मेहता यांनी सांगितले आहे.
तेलाचा साठा थांबवण्यासाठी केंद्रीय अन्न सचिवांनी बैठक
शुक्रवारी केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या होर्डिंगची तपासणी करण्यासाठी राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तेलांची उपलब्धता आणि किंमतीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना तेलबिया आणि तेलाच्या साठ्याचा खुलासा गिरण्या आणि स्टॉकिस्टांकडून घेण्यास सांगितले आहे. स्टॉकिस्ट आणि गिरण्यांना तेल आणि तेलबियांचा डेटा पोर्टलवर अपडेट करावा लागेल आणि त्यांच्या परिसरात त्यांच्या किंमतीचे फलक लावावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.