आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Efforts To Reduce Dependence On China; Companies Will Have To Tell Whether The Product Is Indian Or Not

आत्मनिर्भर भारत:चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न; उत्पादन भारतीय आहे की नाही हे कंपन्यांना सांगावे लागणार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्पादन भारतीय आहे का ते या अॅपने जाणून घ्या

लडाखमधील भारतीय सीमेवर सुरू असलेल्या चीनच्या कुरापती आणि २० भारतीय जवानांच्या बलिदानानंतर आता देशभरात चिनी उत्पादनांवर बहिष्काराचा हुंकार उमटू लागला आहे. केंद्र सरकारनेही आता चीनवरील आयातीचे परावलंबित्व कमी करण्याचे पर्याय शाेधण्यास सुरुवात केली आहे. व्यापार आणि उद्याेग मंत्रालयाही ई-काॅमर्स धाेरणात महत्त्वाच्या तरतुदी समाविष्ट करणार आहे. ई-काॅमर्स कंपन्यांना आता विक्री हाेत असलेले उत्पादन भारतात तयार झाले आहे की नाही, हे सांगणे बंधनकारक असेल. याची अंमलबजावणी करण्यावर सक्रियपणे विचार सुरू आहे.

उत्पादन भारतीय आहे का ते या अॅपने जाणून घ्या

बाजारात विक्री हाेणाऱ्या प्रत्येक पॅकबंद उत्पादनावर एक बारकाेड असताे. उत्पादनाची निर्मिती भारतात झाली आहे की अन्य देशात हे यावरून सहज कळू शकते. प्ले स्टाेअरमध्ये ‘मेड इन इंडिया’ अॅप उपलब्ध आहे. त्याद्वारे काेणते उत्पादन काेणत्या देशात बनले आहे हे बारकाेड स्कॅन करून हे आेळखता येते.

चीनच्या ३५ पेक्षा अधिक कंपन्यांची गुंतवणूक

अमेरिकन एंटरप्रायझेस इन्स्टिट्यूट अँड हेरिटेजच्या अहवालानुसार चीनमधील ३५ पेक्षा जास्त कंपन्या अशा आहेत ज्यांनी २००८ ते २०१९ दरम्यान भारतात १० काेटी डाॅलरपेक्ष जास्त गुंतवणूक केली. यामध्ये अलिबाबाची १२ वर्षांत ११,२५२ काेटींहून जास्त गुंतवणूक आहे. चीनने भारतात १.९७ लाख काेटी रुपयांची गुंतवणूक याेजना आखल्याचे ब्रुकिंग रिसर्च ग्रुपने मार्चमध्ये म्हटले हाेते.

१२ वर्षांत वाढत गेली भारतातील गुंतवणूक

कंपनी   रक्कम

अलिबाबा 11,252

मिनमेटल्स 9120

सिंगशान स्टील 8816

सीट्रिप 8284

फुसान 8208

बीबीके इले. 4256

शांघाय आॅटाे 2660

रक्कम काेटी रुपयांत

बातम्या आणखी आहेत...