आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पाइसजेट शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले:भागविक्रीच्या चर्चेतच शेअर्समध्ये उसळी; वित्तपुरवठा करण्यासाठी गुंतवणूकदारांशी बोलणी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पाईसजेट विमान कंपनीच्या वतीने, भाग विक्रीच्या वृत्ताला ​​​​​​दुजोरा देण्यात आला आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, वित्तपुरवठा करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांशी कंपनीच्या माध्यमातून चर्चा केली जात आहे. त्यातच एअरलाइनचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढल्याने शेअर्सची किंमत 52 रूपयांवर गेली आहे.

स्पाइसजेटचा शेअर्स सद्यस्थितीत 50 रूपयांच्या वर व्यवहार करित आहे. मंगळवारी शेअर NSE वर 44.35 रुपयांवर बंद झाला. तर बुधवारी 10 पैशांनी वाढून 44.45 वर उघडला. तर 28 जुलै रोजी शेअर 37 रूपयांवर होता.

एअरलाईनमध्ये सिंग यांची 60 टक्के भागीदारी
माध्यमांच्या अहवालानुसार, स्पाईसजेटचे प्रवर्तक अजय सिंग एअरलाइनमधील आंशिक शेअर्स विक्री करण्याची शक्यता आहे. मिडल ईस्टर्न एअरलाइनशी त्यांची बोलणी सुरू आहे. सिंग यांची एअरलाइनमध्ये 60 टक्के भागीदारी आहे. स्पाइसजेट कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगीतले की, कंपनी सुरक्षित वित्तपुरवठा मिळवण्यासाठी विविध गुंतवणूकदारांशी चर्चा करित आहे. तर लागू असलेल्या नियमांनुसार ते जाहीर केले जाणार आहे.

स्पाईसजेट कॅश अँड कॅरी मॉडेलमधून बाहेर
स्पाइसजेटने मंगळवारी जाहीर केले आहे की, त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (AAI) थकबाकी भरली आहे. एएआयने 2020 मध्ये स्पाईसजेटला 'कॅश अँड कॅरी' मॉडेलवर ठेवले होते. कारण वाहक त्याची थकबाकी भरू शकत नव्हते. 'कॅश अँड कॅरी' मध्ये विमान कंपनीला दररोज उड्डाण चालवण्यासाठी नेव्हिगेशन, लँडिंग, पार्किंग आदीसाठी पैसे द्यावे लागतात. परंतू स्पाईसजेट कंपनी आता कॅश आणि कॅरी मॉडेलमधून बाहेर पडत आहे.

बातम्या आणखी आहेत...