आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॅटरीचे दर वाढल्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) ७ ते १०% महाग होण्याची शक्यता आहे. परिणामी स्वस्त ईव्हीला प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेला झटका बसू शकतो. ब्लूमबर्ग एनईएफनुसार, यंदा जगभरात लिथियम आयन बॅटरी पॅक सरासरी ७% महागले. मात्र भारतात ईव्ही बॅटरीचे दर ५०-६०% वाढले आहेत. ईव्ही ऊर्जाचे सीईओ संयोग तिवारींनी दै. भास्करला सांगितले की, ईव्हीत आग लागण्याच्या घटनांनंतर सरकारने बॅटरीसंबंधीचे नियम कठोर केले आहेत. डिसेंबरनंतर बॅटऱ्यांच्या टेस्टिंगसाठी एआयएस १५६ मानक लागू होईल. तसेच बीएमएस, आयसीसारखे अनेक इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स व बॅटरीतील खनिजांचेही दर वाढले आहेत. यामुळे देशातील बाजारपेठेत गतवर्षी ११,७०० ते १२,९०० रुपये प्रति किलोवाॅट अवरपर्यंत मिळणारी बॅटरी आता १४,८०० ते १८,९०० रुपयांना मिळत आहे.
देशातील बाजारात ४ कारणांमुळे ईव्ही बॅटरी महागतेय { लिथियम, कोबाल्ट, निकेल आदी खनिजे महागली आहेत. { चीनमध्ये लॉकडाउनमुळे पुरवठ्यात अडचणी येत आहेत. { देशात बॅटरी चाचणीचे कठोर नियम लागू होत आहेत. { बॅटरीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सचे दर वाढले.
देशात २/३ ने वाढली १ केडब्लूएच बॅटरी पॅकची किंमत देश 2022 2021 चीन 10,500 - 11,300 9,000- 9,500 अमेरिका 12,500 - 12,900 11,300-11600 युरोप 12900 - 13900 11,300 - 11,600 भारत 14,800 - 18900 11,700 - 12,900 (किमती भारतीय रुपयांत)
१५% पर्यंत वाढला ईव्हीच्या मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च ऑटोमोबाइल तज्ज्ञ संजीव गर्ग यांनी सांगितले की, बॅटरी महागल्यामुळे इलेक्ट्रिक वाहने, विशेषकरून दुचाकी कंपन्यांच्या उत्पादन खर्चात १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वाहनाच्या किंमतीत बॅटरीचा वाटा ४५-५० टक्क्यांपर्यंत असतो. तथापि, नुकतेच मागणी मंदावल्यामुळे ईव्ही कंपन्यांचा त्याचा सर्व बोजा ग्राहकांवर टाकण्याचे टाळत आहे. मात्र किमतींत ७ ते १० वाढवणे ही त्यांची अपरिहार्यता झाली अाहे. यामुळे पुढील वर्षी इलेक्ट्रिक वाहने महाग होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.