आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Electric Vehicles Will Be Available At Petrol Price Per Annum, Says Union Land Transport Minister Nitin Gadkari

नवी दिल्ली:इलेक्ट्रिक वाहने वर्षात पेट्रोल गाड्यांच्या किमतीत मिळतील, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मत

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात एका वर्षाच्या आत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल गाड्यांच्या खर्चासमान होतील, असे भाकीत केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. यामुळे आपण पेट्रोल व डिझेल आदींवर खर्च होणारे परदेशी चलन वाचवू शकू.

इंडियन रोड काँग्रेसच्या(आयआरसी) एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पायाभूत सुविधेच्या विकासात गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नवविचार, संशोधन निष्कर्ष आणि तंत्रज्ञानांसाठी “इनोव्हेशन बँकेच्या’ स्थापनेचाही प्रस्ताव ठेवला. गडकरी म्हणाले, सरकार २०२५ पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या नेटवर्कला २ लाख किमीपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने काम करत आहे. गेल्या आठ वर्षांदरम्यान महामार्गाची लांबी ५० टक्क्यांहून अधिक वाढून १.४७ लाख किमी झाली.

बातम्या आणखी आहेत...