आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलन मस्क यांनी ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्याची माफी मागितली:न सांगता कामावरून काढल्यावर उडवली होती खिल्ली; दोघांचे ट्विट होतेय व्हायरल

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांच्याच माजी कर्मचाऱ्यांची माफी मागण्याची वेळ आली आहे. सुरूवातीला मस्क यांनी ट्विटरवर कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाची खिल्ली उडवली. मात्र, प्रदीर्घ चर्चेचनंतर अखेर मस्क यांनी माफी मागितली आहे. कर्मचारी आणि मस्क यांच्यात झालेल्या ट्विट संभाषण सद्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

मुळात, शनिवारी (25 फेब्रुवारी) काही कर्मचारी ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा त्यांना सिस्टममध्ये लॉग इन करता आले नाही. चौकशी केल्यावर कळले की कंपनीतून 200 कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले आहे. परंतु कामावरून काढून टाकण्याचे कोणतेही कारण सांगण्यात आले नाही. अनेक कर्मचार्‍यांनी ट्विटरच्या अधिकार्‍यांकडून मालकाला म्हणजे एलन मस्क यांना मेल पाठवले पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

या कर्मचार्‍यांमध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणार्‍या हरलदूर थोरलिफसन यांचा देखील समावेश होता. कोणतेही स्पष्ट कारण सापडले नाही तेव्हा वैतागलेल्या हरलदूर थोरफिफसन यांनी एलम मस्क यांना ट्विट केले. न सांगता नोकरीवरून काढून टाकण्याचे काय कारण आहे. त्यावर एलन मस्क यांनी उत्तर दिले. दोघांमधील दीर्घ संभाषणानंतर मस्क यांनी अखेर कर्मचाऱ्याला व्हिडिओ कॉल केला. तर त्यानंतर ट्विटरवर जाहीरपणे माफी मागितली. त्याचवेळी हरलदूरला पुन्हा कामावर घ्यावे, असेही सूचित करण्यात आले.

मस्क आणि अन्य दोघात झालेले संभाषण

हॅली : हरलदूर थोरलियफसन यांचे ट्विटरवर हॅली नावाने खाते आहे. एलन मस्क यांनी मस्कला टॅग करत, हेलीने ट्विट केले की, त्यात लिहले की, तो नोकरीवर आहे की नाही. गेल्या नऊ दिवसांपासून एचआर किंवा एलन मस्क यांनी यासंदर्भातील कोणत्याही मेलला प्रतिसाद दिला नाही. या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. तुम्ही मला काही सांगाल का?

एलन मस्क : तुम्ही कशावर काम करत आहात?
हॅली : मी याबद्दल अधिक बोललो तर ते गोपनीयतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होईल. जर तुमच्याकडे वकील असतील तर कृपया मला त्यांच्याकडून लेखी उत्तर द्या जेणेकरून मी हे सर्व येथे सांगू शकेन.

एलन : हे मंजूर आहे, तुम्ही नक्की सामोरे जा.
हॅली : यानंतर हॅलीने स्वतःशी संबंधित संपूर्ण माहिती दिली. त्याने असेही सांगितले की, एलन मस्क कंपनीत आल्यापासून काय केले गेले हे देखील त्याला माहित आहे.
सरतेशेवटी, हेलीने पुन्हा एकदा एलन यांना विचारले की, माझे काम बाकी आहे का आणि मला डीलप्रमाणे पैसे दिले जातील का यानंतर एलन मस्क यांनी त्यांच्याशी संवाद साधला. जवळपास 10 ट्विट एकामागून एक केले गेले. त्याच्या आजारपणामुळे होणाऱ्या समस्याबाबत एलन मस्कला हॅलीने सांगितले.

एकीकडे ट्विटरचे माजी कर्मचारी डॅनियल हफ्टन यांनी हॅलीचे समर्थन करताना लिहिले की, 'ज्याने हल्ली यांच्यासोबत थेट काम केले आहे, त्यांना माहित आहे की, त्यांची कार्यशैली पुढची पातळी आहे. वळणाच्या दरम्यान, हे पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. हल्ली तुम्हाला तुमच्या टीममध्ये हवी असलेली व्यक्ती आहे. मला वाटतं इथे कुठेतरी गोड गैरसमज झाला आहे.

अखेर मस्क यांनी हॅलीला VC करून माफी मागितली

डॅनियलच्या या कमेंटनंतर मस्क यांनी हॅली यांना व्हिडिओ कॉल केला. ट्विट करून याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, 'डॅनियलच्या ट्विटनंतर मी हॅलीला व्हिडिओ कॉल केला. जेणेकरून वस्तुस्थिती जाणून घेता येईल. ट्विटद्वारे संवाद साधण्यापेक्षा लोकांशी बोलणे अधिक चांगले असे एलन मस्क म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...