आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी त्यांची हत्या होऊ शकते असा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्याशी संबंधित खुलाशांसह इतर विषयांवर थेट प्रश्नोत्तर सत्रात मस्क यांनी हा दावा केला. शिवाय, चर्चेदरम्यान, टेस्ला आणि स्पेसएक्सच्या सीईओंनी फ्री स्पीचचे महत्त्व आणि ट्विटरसाठी त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले.
मस्क ओपन-एअर कार परेड करणार नाहीत
ट्विटर स्पेसवर दोन तासांच्या संभाषणात, मस्क म्हणाले की ते कोणत्याही ओपन-एअर कार परेडचे आयोजन करणार नाहीत. ते म्हणाले, 'खरं सांगायचं तर माझ्यासोबत काहीतरी वाईट घडण्याचा, एवढेच नाही तर गोळीबार होण्याचा धोका आहे.'
मागील काही दिवसांपूर्वी ट्विटरवर बायनेड यांच्या मुलाचा लॅपटॉप वाद दडपल्याची कथा सांगण्यात आली होती. हंटर बायडेन 2 वर्षांपूर्वी या प्रकरणात अडकले होते.
ट्विटर फाईल्सच्या नावाने करण्यात आलेल्या खुलाशांमध्ये असे सांगण्यात आले की, न्यूयॉर्क पोस्टच्या हंटर बायडेन लॅपटॉपच्या कथेवर टिप्पणी करणाऱ्या वापरकर्त्यांना ट्विटरच्या उच्च अधिकाऱ्यांनी निलंबित आणि सेन्सॉर केले होते. मस्क यांनी दावा केला होता की, फाईल्स सांगतात ट्विटर 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या एका हाताप्रमाणे काम करत होते.
असे भविष्य, जिथे आपण न घाबरता बोलू शकतो
मस्क यांनी फ्री स्पीचबद्दल देखील बोलले. ते म्हणाले- "आम्हाला फक्त असे भविष्य हवे आहे जिथे आमच्यावर अत्याचार होणार नाहीत. जिथे आमचे शब्द दडपले जात नाहीत आणि आपण आपले मत कोणत्याही भीतीशिवाय ठेवू शकतो." मस्क म्हणाले, 'जोपर्यंत तुम्ही इतर कोणाचेही नुकसान करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय बोलायचे आहे त्याची परवानगी दिली पाहिजे.' ते म्हणाले, "कंट्रोल्ड स्पीच डिफॉल्ट आहे, फ्री स्पीच नाही."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.