आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Elon Musk Parag Agrawal | Twitter Board Of Directors Fired By Musk I Latest News And Update  

मस्क यांनी ट्विटरचे संपूर्ण संचालक मंडळ हटवले:आता एलन मस्क एकमेव बोर्ड सदस्य; यापूर्वी CEO अग्रवाल यांच्यासह वरिष्ठांना काढले

सॅन फ्रान्सिस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरचे नवीन 'चीफ' एलन मस्क यांनी संपूर्ण बोर्ड मेंबरला काढून टाकले आहे. आता ते कंपनीच्या संचालक मंडळातील (बोर्ड) एकमेव सदस्य बनले आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या नव्या फाइलिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यूएसच्या मीडिया अहवालानुसार, मस्क यांनी संलाचक बोर्डाला हटविण्याची योजना यापूर्वीच आखलेली होती. जेव्हा प्रत्यक्षात त्यांनी ट्विटर टेकओव्हर केले त्या दिवसांपासून वरिष्ठांना बोर्डावरून हटविण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

माजी सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेहगल आणि कायदेशीर आणि पॉलिसी प्रमुख विजया गड्डे यांच्यासह कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना मस्क यांनी काढून टाकले आहे. कंपनीकडे प्रत्येक कोडरसाठी सुमारे 10 व्यवस्थापक आहेत. असे सांगून मस्क यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

5,600 कर्मचारी काढले जाऊ शकतात
द वॉशिंग्टन पोस्टमधील एका अहवालानुसार, मस्क कंपनीच्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी 75% किंवा सुमारे 5,600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकतात. ट्विटर डील दरम्यान त्यांनी संभाव्य गुंतवणूकदारांना हे सांगितले होते. मात्र, हा अहवाल आल्यानंतर ट्विटरचे जनरल काउंसिल सीन एजेट यांनी त्याचा नकार केला आहे. कर्मचार्‍यांना एक ईमेल पाठवून त्यांनी सांगितले की, कंपनी टाळेबंदीची कोणतीही योजना करत नाही.

मस्क ट्विटरचे सीईओ बनले
इलॉन मस्क यांनी वेगळ्या एसईसी फाइलिंगमध्ये जाहीर केले की ते आता ट्विटरचे सीईओ आहेत. म्हणजेच आता ते कंपनीचे सीईओ आणि संचालक दोन्ही आहेत. तथापि, मस्कने ट्विटरवर एका वापरकर्त्याच्या शुभेच्छांना उत्तर देताना म्हटले आहे की सीईओ म्हणून आपले स्थान तात्पुरते आहे. याचे कारण त्यांनी दिले नाही. मस्क आधीच टेस्ला स्पेसएक्स, न्यूरालिंक आणि द बोरिंग कंपनीकडे नेत आहे

क्रमवारीनुसार घटनाक्रमाला जाणून घेऊया...

  • करार अंतिम झाला तेव्हा: एलोन मस्कने गुरुवारी (27 ऑक्टोबर) करारावर स्वाक्षरी केली.
  • सीईओ पराग अग्रवाल का काढून टाकले: मस्क यांनी पराग आणि दोन अधिका-यांवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट खात्यांच्या संख्येबद्दल त्यांची आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

कराराची कारणे कोणती होती?
पहिले कारण :
मस्क यांनी सूचित केले की, भविष्यात Twitter चे जाहिरात धोरण देखील बदलले जाईल. मला ट्विटर हे सर्वोत्तम जाहिरात प्लॅटफॉर्म बनवायचे आहे. जेथे सर्व वयोगटातील वापरकर्ते चित्रपट पाहू शकतात किंवा व्हिडिओ गेम खेळू शकतात.

दुसरे कारण : मस्क यांनी सागीतले की, मी पैसे कमावण्यासाठी नव्हे तर मानवतेला मदत करण्यासाठी ट्विटरशी करार केला. न्यायालयाने मस्क यांना 28 ऑक्टोबरपर्यंत सद्याच्या अटींवर ट्विटर कराराला अंतिम स्वरूप देण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...