आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Elon Musk Promise To Users I Best Coverage And Live Commentary I FIFA World Cup 2022 First Match On 20th November On Twitter

FIFA-2022 बाबत मस्क यांची घोषणा:वर्ल्डकपचा पहिला सामना ट्विटरवर दाखवणार; मस्क म्हणाले- बेस्ट कव्हरेज अन् कॉमेंन्ट्री असेल

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर खरेदी केल्यापासून एलन मस्क नियमित नवीन घोषणा करित आहेत. कर्मचारी कपात, अधिकाऱ्यांची हकालपट्टी, ब्लू सबस्क्रिप्शन सेवा यासह अनेक निर्णयांमुळे मस्क चर्चेत आहेत. अशातच मस्क यांनी कतारमध्ये होणाऱ्या 'FIFA वर्ल्डकप 2022' (FIFA) संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

एलन मस्क यांनी नुकतेच ट्विट केले की, ट्विटर रविवारी (20 नोव्हेंबर) वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्याचे थेट कव्हरेज आणि रिअल-टाइम कॉमेंट्री करणार आहे. म्हणजेच ट्विटरवरही प्रेक्षकांना फिफा वर्ल्डकपचा सामना पाहता येणार आहे.

Twitter पाहा- सर्वोत्तम कव्हरेज अन् रिअल-टाइम समालोचन

  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विट केले की, वर्ल्ड कपचा पहिला सामना रविवारी होणार आहे. ट्विटरवर सर्वोत्तम कव्हरेज आणि रिअल टाइम कॉंमेंट्री पाहायला मिळणार आहे. मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये फिफाचा उल्लेख केला नसला तरी वर्ल्ड कप शब्द लिहला आहे.
  • इतकंच नाही तर ट्विटमध्ये मस्क यांनी मॅचच्या कव्हरेज आणि कॉमेंट्रीबाबत इतर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. FIFA विश्वचषक 2022 चा 22 वा सीजन रविवारपासून सुरू होत आहे. कतारमध्ये सुरू होत आहे. मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये फिफा वर्ल्ड कपबद्दल बोलत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पहिला सामना कतार आणि इक्वेडोर यांच्यात रंगणार
यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात पहिला सामना होणार आहे. FIFA विश्वचषक 2022 मध्ये जगभरातील 32 संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफीसाठी स्पर्धा करताना दिसतील. यावेळी फिफा विश्वचषकात 8 गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात 4 संघ ठेवण्यात आले आहेत. तर वर्ल्ड कपचा अंतिम सामना 18 डिसेंबरला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...