आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क कर्मचारी कमी करणार आहेत. मस्क म्हणाले की, अर्थव्यवस्थेबद्दल माझी धारणा नकारात्मक आहे, म्हणून मला 10% कर्मचारी कमी करावे लागतील. रॉयटर्सने अंतर्गत मेलच्या आधारे एक अहवाल प्रकाशित केला आहे. कर्मचारी कपातीशी संबंधित हा मेल गुरुवारी टेस्लाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. त्याचे शीर्षक 'पॉज ऑल हायरिंग वर्ल्डवाइड' असे होते. म्हणजे जगभरातील सर्व भरती थांबवा.
मस्क यांचा कर्मचाऱ्यांना इशारा
यापूर्वी एलन मस्क यांनी टेस्ला कर्मचाऱ्यांना एकतर कार्यालयात येऊन काम करावे अन्यथा टेस्ला सोडण्याचा इशारा दिला होता. यासंबंधीचा एक मेल सोशल मीडियावर लीक झाला होता. या मेलमध्ये कोरोनामुळे घरन सुरू झालेले काम (WFH) संपवण्याची घोषणा करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला किमान 40 तास कार्यालयात काम करावे लागेल, असे मेलमध्ये लिहिले होते. टेस्लाच्या मुख्य कार्यालयात आल्यानंतरच कर्मचाऱ्यांना काम करावे लागेल, असेही त्यात लिहिले होते. जर एखादा कर्मचारी दूरच्या शाखा कार्यालयात काम करत असेल तरी चालणार नाही.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत मस्क
एलन मस्क यांची एकूण संपत्ती 233.7 अब्ज डॉलर (सुमारे 18 लाख कोटी रुपये) आहे. ते टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या माध्यमातून पृथ्वीवर आणि SpaceX च्या माध्यमातून अंतराळात वाहतूक क्रांती आणण्याचे काम करत आहेत. त्याच्याकडे टेस्लामधील 21% % भागिदारी आहे, मात्र, त्यांनी कर्जासाठी कोलेटरल म्हणून अर्ध्याहून अधिक भागीदारी गहाण ठेवली आहे. त्यांनी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर 44 अब्ज डॉलर मध्ये खरेदी करण्याचा करार केला आहे. ट्विटरमध्ये त्यांची 9.1% हिस्सेदारी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.