आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेस्लाने आपल्या इलेक्ट्रिक सेमी ट्रकची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा ट्रक रस्त्यावरील इतर कोणत्याही डिझेल ट्रकच्या तुलनेत 3 पट जास्त शक्तिशाली आहे. हा ट्रक 0-97 किमीचा वेग फक्त 20 सेकंदांतच धारण करू शकतो. याच्या बॅटरीची रेंज 805 किलोमीटरपर्यंत आहे. तर किंमत दीड लाख डॉलर म्हणजेच सुमारे सव्वा कोटी रुपये असू शकते.
पेप्सीला डिलिव्हर केला पहिला ट्रक
कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी नेवाडातील स्पार्क्समध्ये कंपनीच्या गिगाफॅक्ट्रीत आयोजित एका कार्यक्रमात सॉफ्ट-ड्रिंक कंपनी पेप्सीला पहिला ट्रक डिलिव्हर केला. पेप्सीने डिसेंबर 2017 मध्ये 100 ट्रक्सची ऑर्डर दिली होती, जेव्हा टेस्लाने एका इव्हेन्टमध्ये पहिल्यांदा हा ट्रक रिव्हिल केला होता. इतर हाय-प्रोफाईल ग्राहक प्रतीक्षा यादीत आहेत. यात वॉलमार्ट आणि युपीएसचा समावेश आहे. हा ट्रक 2019 मध्येच डिलिव्हर केला जाणार होता, पण कोरोनामुळे यात विलंब झाला.
फ्युचर ऑफ ट्रकिंग
टेस्लाने सेमीला फ्युचर ऑफ ट्रकिंग म्हणजेच ट्रकिंगचे भविष्य म्हटले आहे. मस्क इव्हेंटमध्ये म्हणाले की, 'तुम्हाला हा चालवण्याची इच्छा आहे. म्हणजे, असे वाटते की ही वस्तू भविष्यातून आली आहे. ही एखाद्या बीस्टसारखी आहे. हे वास्तविक एखादी कार चालवण्यासारखे आहे. ट्रक चालवण्यासारखे नाही.'
या ट्रकमध्ये उत्तम व्हिजिबिलिटीसाठी युनिक सेंट्रल सिटींग देण्यात आली आहे. दोन्हीकडे एका मोठ्या स्क्रिनसह कपहोल्डर्स आणि एक वायरलेस फोन चार्जरसह आणि एक कन्सोल देण्यात आला आहे. याशिवाय अपघाताच्या बाबतीत ऑल इलेक्ट्रिक आर्किटेक्चर रोलओव्हर रिस्क आणि केबिन इन्ट्रुशन दोन्ही कमी करते असा कंपनीचा दावा आहे.
ब्रेकिंगद्वारे बॅटरी चार्ज
सेमी ट्रकमध्ये जॅकनायफिंग रोखण्यासाठी ट्रॅक्शन कंट्रोल, बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि सीमलेस हायवे ड्रायव्हिंगसाठी एक ऑटोमेटिक क्लच देण्यात आले आहे.
36.74 टन कार्गोसह 805 किमी प्रवास
मस्क यांनी सांगितले की 8 सेमी ट्रक्सपैकी एकाने 36.74 टन कार्गोसह 805 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. हा प्रवास कॅलिफोर्नियातील फ्रेमोन्टमधील टेस्ला फॅक्ट्रीपासून सॅन दिएगोपर्यंत होता. या प्रवासात बॅटरी चार्ज करण्याची गरज भासली नाही.
लिक्विड-कूल्ड चार्जिंग कनेक्टर डेव्हलप केले
मस्क यांनी इव्हेन्टदरम्यान हा खुलासाही केला की, टेस्लाने एक नवा लिक्विड कूल्ड चार्जिंग कनेक्टर डेव्हलप केला आहे, जो 1 मेगावॅट डायरेक्ट करंट पॉवर देण्यात सक्षम आहे. मस्क म्हणाले की, 'हे सायबर ट्रकसाठीही वापरले जाणार आहे.' लोकांना दीर्घ कालावधीपासून सायबर ट्रकची प्रतीक्षा आहे. याचे उत्पादन 2023 च्या अखेरपर्यंत सुरु होण्याची अपेक्षा आहे.
इलेक्ट्रिक ट्रकसमोर अनेक आव्हाने
डेम्लर, वोल्वो, पीटरबिल्ट आणि BYD सारखे प्रमुख उत्पादकही इलेक्ट्रिक लॉन्ग-होलर्सवर काम करत आहेत. तथापि अजून इलेक्ट्रिक वाहने व्यापक प्रमाणात स्वीकारले जाण्यापूर्वी अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. याच्यासमोर वेट रेस्ट्रिक्शनपासून चार्जिंग स्टेशन्सची उपलब्धता अशी अनेक आव्हाने आहेत. ट्रक स्टॉपही मोठ्या बॅटरीची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तयार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.