आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Elon Musk Twitter Latest News | Twitter Banned Blue Tick Subscription I Rapidly Growing Number Of Fake Accounts I Latest News And Update 

ट्विटरने ब्लू टिक सबस्क्रिप्शनवर घातली बंदी:वेगाने वाढणाऱ्या बनावट खात्यामुळे 8 डॉलरची सबस्क्रिप्शन सेवा बंद करावी लागली

वॉशिंग्टन युएस5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शन सेवा थांबविली आहे. माध्यम सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने 7.99 डॉलरला सुरू केलेली ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सेवा बंद केली आहे. ट्विटरने आपल्या iOS वापरकर्त्यांसाठी ही सेवा सुरू केली होती. परंतु म्याशाबेल (Mashable) च्या अहवालानुसार, ब्लू सबस्क्रिप्शनची सेवा घेण्याचा पर्याय जो iOS अ‌ॅपच्या साइडर बारमध्ये उपलब्ध होता. तो पर्याय आता दिसून येत नाही.

द व्हर्ज यांच्या निदर्शनास देखील आले असून यूजर्सना ही सुविधा मिळत नाही. ​​​​​​युजर्सला देखील एक संदेश आलेला आहे. ज्यात लिहिले होते की, तुमच्या आवडीबद्दल धन्यवाद..! ट्विटर ब्लू सेवा भविष्यात तुमच्या देशात उपलब्ध होईल, कृपया तुम्ही ती नंतर तपासू शकता.

नवीन फी लावल्यामुळे अनेक बनावट खाती दिसू लागली
पेड व्हेरिफिकेशन फीचर सुरू होताच, ट्विटरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांसारख्या सेलिब्रिटींची अनेक बनावट खाती समोर आली. इतकंच नाही तर काही व्हेरिफाईड अकाऊंट्सनी 'सुपर मारियो' आणि बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्सची गेमिंग कॅरेक्टरची बनावट खातीही तयार केली आहेत.

एलन मस्क यांनी हे प्रकरण हाताळले
एलन मस्क यांनी या प्रकरणात ट्विट द्वारे सांगितले की, येथे कोणाचीही तोतयागिरी चालणार नाही. सेलिब्रिटींच्या नावाने फेक अकाऊंट किंवा विडंबन केले तर खाते बंद केले जाईल. द व्हर्जच्या वृत्तानुसार, अशाच प्रकारच्या समस्या लक्षात घेता ब्लू सबस्क्रिप्शन सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

नुकतीच सुरू झाली होती ब्लू सबस्क्रिप्शन सेवा

एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ब्लू टिक म्हणजेच ट्विटरवर व्हेरिफाईड अकाउंटसाठी यूजरला आता प्रत्येक महिन्याला $8 (जवळपास 660 रुपये) द्यावे लागतील. हे शुल्क देशानुसार वेगवेगळे असेल. एलन मस्क यांनी 27 ऑक्टोबर रोजी ट्विटर खरेदी केल्यानंतर पाच दिवसांनी मंगळवारी रात्री ही घोषणा केली.

फक्त ब्लू युजर्सला ब्लू टिक बॅज मिळेल
एलोन मस्कने गेल्या आठवड्यात सांगितले होते की फक्त ट्विटर ब्लू वापरकर्त्यांना आता त्यांच्या खात्यावर ब्लू टिक व्हेरिफाइड बॅज मिळेल. सत्यापित बॅज असलेल्या विद्यमान वापरकर्त्यांना देखील Twitter Blue चे सशुल्क सदस्यता आवश्यक असेल. तथापि, या वापरकर्त्यांना सशुल्क सदस्यत्वावर स्विच करण्यासाठी सुमारे 3 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळू शकतो. जर त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शन घेतले नाही तर त्यांच्या खात्यातून ब्लू टिक काढून टाकले जाईल.

भारतात ब्लू सबस्क्रिप्शनसाठी 719 रुपये भरावे लागतील
भारतातील काही ट्विटर वापरकर्त्यांना 10 नोव्हेंबरच्या रात्री ब्लू सबस्क्रिप्शनसाठी अ‌ॅपल अ‌ॅप स्टोअरवर पॉप-अप मिळाले. यामध्ये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची मासिक किंमत 719 रुपये नमूद करण्यात आली होती. जरी किंमत अद्याप अधिकृतपणे जाहीर केली गेली नाही.

पूर्वी फक्त योग्य वापरकर्त्याला मिळत असे ब्लू टिक
यापूर्वी ट्विटरवर, ओळख पडताळणीनंतर ब्लू टिक वापरकर्त्यांना प्राप्त झाले होते, ज्याने त्या वापरकर्त्याची सत्यता आणि अचूकता दर्शविली होती. पण आता युजर्स पैसे देऊन ब्लू टिक खरेदी करू शकतात. यानंतर ब्लू टिक असलेल्या बनावट खात्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या व्हेरिफाईड अकाऊंटवरून फेक ट्विटही येऊ लागले, त्यानंतर ट्विटरला सशुल्क सेवेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा लागला.

बातम्या आणखी आहेत...